‘ते’ मनसे कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:47 AM2018-05-12T04:47:49+5:302018-05-12T04:47:49+5:30

बुलेट ट्रेनच्या मोजणी प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मनसेच्या त्या आठ कार्यकर्त्यांना, ठाणे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

'They' MNS activists in judicial custody | ‘ते’ मनसे कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत

‘ते’ मनसे कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत

Next

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मोजणी प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मनसेच्या त्या आठ कार्यकर्त्यांना, ठाणे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्याची सुनावणी येत्या सोमवारी करण्यात येणार आहे.
सोमवारी ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत शीळ येथे बुलेट ट्रेनच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या कार्यकर्त्यांनी ती प्रक्रिया उधळून लावली होती. त्यानंतर, दुसºया दिवशीही आंदोलन करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या शहराध्यक्ष रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सागर जेथे, विनायक रणपिसे, जनार्दन खरिवले, शरद पाटील आणि कुणाल पाटील यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली होती.

Web Title: 'They' MNS activists in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.