‘ते’बोलतात वेगळे, लोक वेगळे समजतात; अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 08:55 AM2022-11-26T08:55:04+5:302022-11-26T08:55:47+5:30
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबिर व महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते.
ठाणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठी माणसांवर, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलत असतात, परंतु लोक वेगळे समजतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या विधानाचे समर्थन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोश्यारी अडचणीत आले आहेत.
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबिर व महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अमृता म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकलेले ते एकमेव राज्यपाल आहेत. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलतात, परंतु लोक ते वेगळेच समजतात. श्रद्धा वालकर हिला न्याय मिळाला पाहिजे असे त्या म्हणाल्या.