‘ते’ घर उभारणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:22 AM2017-08-02T02:22:31+5:302017-08-02T02:22:31+5:30

नौपाडा भागातील धोकादायक इमारती ऐवजी प्रभाग समितीच्या कर्मचाºयांनी बाजूला असलेल्या घरावरच हातोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.

They 'wait for the house to be built | ‘ते’ घर उभारणीच्या प्रतीक्षेत

‘ते’ घर उभारणीच्या प्रतीक्षेत

Next

ठाणे : नौपाडा भागातील धोकादायक इमारती ऐवजी प्रभाग समितीच्या कर्मचाºयांनी बाजूला असलेल्या घरावरच हातोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चुकीने ही कारवाई झाल्याची कुबली नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली असली तरीदेखील अद्यापही ज्या घरावर हातोडा टाकला त्यांनामहापालिकेनेते काही बांधून दिलेले नाही. उलट कागदपत्रांची पूर्तता करण्याचा अट्टाहास अधिकाºयांनी धरला असून यामुळे उल्हास मांडये यांचे कुटुंब घरासाठी पालिकेच्या पायºया झिजवत आहे.
नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिर येथे तळ अधिक चार मजल्यांची इमारत असून तिला धोकादायकची नोटीस पालिकेने बजावली होती. तिच्या पाठीमागे सुस्थितीमधील एक बैठे घर आहे. या घरात सुमारे १९७० पासून उल्हास मांडये हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मागील शुक्रवारी ते बाहेर गेले असता, नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाºयांनी धोकादायक इमारतीला हात न लावता या घरावरच बुलडोझर फिरविला आहे. विशेष म्हणजे त्यांचे घरातील सामानदेखील गायब आहे. पालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अशा पद्धतीने घरावर बुल्डोझर फिरवलाच कसा असा जाब ज्या वेळेस मांडये कुटुंबियांनी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांना विचारला असता, ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झाली असल्याची कबुली त्यांनी दिली.
त्यानंतर सोमवार पर्यंत पुन्हा तुम्हाला आहे त्याच जागी घर बांधून दिले जाईल, असे आश्वासनही दिल्याची माहिती प्रणय मांडये यांनी दिली. त्यातही झालेल्या कारवाईच्या विरोधात आणि साहित्य गायब झाल्याच्या विरोधात या कुटुंबाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, अडीच तास ताटकळत ठेवून पोलिसांनीदेखील आमची तक्रार घेतलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.
घर पुन्हा मिळेल, या आशेवर आम्ही होतो. परंतु प्रभाग समितीवाल्यांनी सोमवारी तुम्ही तिथे राहत होतात का?, जागेचे पुरावे आहेत का?, कधी पासून राहता, टॅक्स पावती आहे का? असे नाना प्रश्न विचारले. ते पुरावे देखील सहायक आयुक्त गायकवाड यांच्याकडे सादर केले आहेत. परंतु अद्यापही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. उलट केवळ हेलपाटे घालविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. दरम्यान बाजूला असलेल्या इमारतीला पालिकेने धोकादायकची नोटीस दिली होती. त्यानंतर त्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु ती झालेली नसल्याने यात केवळ विकासकाच्या फायद्यासाठी आमच्या घरावर बुलडोझर फिरविल्याचा आरोप मांडये यांनी केला आहे. त्यामुळे आता न्याय मिळविण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरावाजे ठोठावावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Web Title: They 'wait for the house to be built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.