केबलवाला असल्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोरटयाने लांबवले सोन्याचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:42 AM2020-12-19T00:42:50+5:302020-12-19T00:46:56+5:30

केबलवाला असल्याचे भासवून घरात शिरलेल्या एका भामट्याने घरातील जेष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळ काढल्याची घटना नुकतीच घडली.

A thief broke into the house under the pretext of being a cable car owner and removed the gold mangalsutra | केबलवाला असल्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोरटयाने लांबवले सोन्याचे मंगळसूत्र

ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

Next
ठळक मुद्दे केबल कनेक्शन तपासणीचाही केला बहाणा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केबलवाला असल्याचे भासवून घरात शिरलेल्या एका भामट्याने घरातील जेष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळ काढल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंदणी दत्त मंदिर रोडवरील केशव अपार्टमेंट मध्ये ही ६८ वर्षीय वृद्ध महिला तिच्या ७२ वर्षीय पतीसमवेत वास्तव्याला आहे. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास एका भामटयाने त्यांच्या दारावरची बेल वाजवली. या वृद्धेने दरवाजा उघडल्यावर आपण केबलवाला असल्याची त्याने बतावणी केली. सर्व केबल कनेक्शन तपासणीसााठी तसेच जेष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना ५० टक्के डिस्काउंट स्कीमची माहिती द्यायची असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याने या दाम्पत्याला अन्य एका कामामध्ये गुुंतवून घरातील बेडवरील ६.४८ ग्रॅम वजनाचे तीन हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार पोळ हे करीत आहेत.

Web Title: A thief broke into the house under the pretext of being a cable car owner and removed the gold mangalsutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.