कल्याणमधील घरफोड्या करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 03:00 PM2017-08-11T15:00:18+5:302017-08-11T15:04:48+5:30
कल्याण शहरात घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव सॅमसन रुबीन डॅनियल (19) असे आहे.
कल्याण, दि. 11 - कल्याण शहरात घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव सॅमसन रुबीन डॅनियल (19) असे आहे. त्याच्याकडून 195 ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. सॅमसनकडून सोने विकत घेणा-या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या सोनाराचे नाव राजीव उर्फ अमोल प्रदीप सोनी (21) असे आहे. त्याचे दुकान काळा तलाव परिसरातील गावदेवी मंदिराजवळ आहे. अटक करण्यात आलेला चोरटा सॅमसन हा सराईत चोर आहे. त्याने अटकेनंतर चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तो घरांवर पाळत ठेऊन चो-या करायचा. सॅमसन हा कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथे राहणारा आहे. केवळ मौजमजा करण्यासाठी सॅमसन हा घरफोड्या करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
आठवीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडल्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षापासून सॅमसन चोरी करत आहेत. त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. सुधारगृहातून सुटून आल्यावर त्याने पुन्हा चोरीचा उद्योग सुरूच ठेवला. त्याच्याकडून पोलिसांनीहस्तगत केलेल्या 195 ग्रॅम सोन्याची किंमत 5 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली आहे.