ठाण्यातील दुकानांमध्ये चोरी करणारे सराईत चोरटे दहा तासांमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 01:11 AM2020-10-29T01:11:38+5:302020-10-29T01:26:22+5:30
कासारवडवलीतील सहकार सुपर बाजार या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दहा हजारांची रोकड आणि काही वस्तू चोरणाऱ्या सर्वेश गौड याच्यासह चार जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी दहा तासांमध्ये अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कासारवडवलीतील सहकार सुपर बाजार या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दहा हजारांची रोकड आणि काही वस्तू चोरणाºया सर्वेश गौड (21), शंकर हनवते (30), राहुल घोरपडे (19) आणि अक्षय जाधव (27 ) या चार जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी दहा तासांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून रिक्षा, चोरीतील टेपरेकॉर्डर असा 87 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली.
ठाण्यातील घोडबंदररोड कासारवडवली येथील कांचनपुष्प सोसायटी मध्ये सहकार सुपर बाजारचे मालक २५ आॅक्टोबर रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले. नेहमीप्रमाणे दुसºया दिवशी २६ आॅक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते आले असता, त्यांना दुकानाचे बाहेरील बाजूस असलेले लोखंडी शटर हे कोणीतरी उचकटून तोडल्याचे निदर्शनास आले. दुकानातील ड्रॉव्हरमधील 10 हजारांची रोकड आणि दुकानातील टेप रेकॉर्डरची चोरी झाल्याचे आढळले. यापकरणी त्यांनी तातडीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने काशीमीरा, भिवंडी, वागळे इस्टेट आदी परिसरात यातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आझाद नगर रोड या ठिकाणी सापळा रचून सर्वेश गौड याच्यासह चौघा सराईत चोरटयांना त्यांनी २६ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून अडीच हजारांची रोकड, चोरीसाठी वापरले रिक्षा आणि टेपरेकॉर्डर असा असा 87 हजार 500 रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध श्रीनगर, वागळे इस्टेट आदी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.