मारुती मंदिरात सेल्फी काढून चोरट्याने लांबवली दानपेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 09:51 PM2021-11-10T21:51:15+5:302021-11-10T21:53:57+5:30

खोपट येथील मारुती मंदिरात चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी काढल्यानंतर नतमस्तक होऊन दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद आहे.

Thieves steal donation box by taking selfie in Maruti temple | मारुती मंदिरात सेल्फी काढून चोरट्याने लांबवली दानपेटी

खोपट एसटी आगाराजवळील घटना

Next
ठळक मुद्देखोपट एसटी आगाराजवळील घटनाचोरी सीसीटीव्हीमध्ये कैद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खोपट येथील मारुती मंदिरात चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी काढल्यानंतर नतमस्तक होऊन दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून बुधवारी तक्रार दाखल झाली नव्हती.
खोपट एसटी बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेथून जवळच असलेल्या या मंदिरामध्ये मंगळवारी रात्री चोरट्याने प्रवेश केला. रेकी केल्यानंतर सेल्फी काढून दर्शन घेऊन मंदिरातील दानपेटी घेऊन धूम ठोकली. मंदिरातील सीसीटीव्हीतील हा प्रकार बुधवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आपण तक्रार करणार नसल्याचे पुजाऱ्याने सांगितले.

Web Title: Thieves steal donation box by taking selfie in Maruti temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.