कळवा खाडीवरील तिसरा पूल उतरणार पटणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:58+5:302021-03-19T04:39:58+5:30
ठाणे : कळव्याच्या खाडीवरील तिसरा पूल पटनी येते उतरविण्यात येणार आहे. गुरुवारी एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव आणि ठाणे महापालिका ...
ठाणे : कळव्याच्या खाडीवरील तिसरा पूल पटनी येते उतरविण्यात येणार आहे. गुरुवारी एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची ठाण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा पूल रेल्वेच्या पुलावरून पुढे उतरविण्याबाबत चर्चा झाली. तसेच बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्यवळण मार्ग आणि मुंब्रा ते शीळ मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामातील अडथळे दूर करणे अशा महत्त्वाच्या प्रकल्पाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चा झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
खाडीकिनारी मार्ग आणि कळवा बाह्यवळण मार्ग प्रकल्पांच्या आराखड्यांमध्ये काहीसा बदल करून ते तातडीने सादर करण्याच्या सूचना राजीव यांनी दिल्या. महापालिका हद्दीत एमएमआरडीएचे विविध प्रकल्प सुरू आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते. कळवा खाडीवर तिसरा खाडी पूल उभारण्यात येत आहे. परंतु तो पुढे कळवा हॉस्पिटलच्या पुढे उतरणार आहे. त्यात पुढे रेल्वेलाईन असल्याने येथे बॉटलनेकची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल रेल्वे लाइनवरून पुढे पटनी येथे उतरविण्यात यावा, अशी सूचना आव्हाड यांनी केली होती. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आव्हाड यांनी हीच मागणी केली होती. शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा पूल पुढे कसा उतरविता येऊ शकतो, त्यामुळे किती खर्च वाढू शकतो, रेल्वेकडून कशा पध्दतीने मंजुरी घेता येऊ शकते, यावर ठोस चर्चा झाल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. पूल पटनी येथे उतरविल्यामुळे येथील वाहतूक कोंडी संपुष्टात येऊन नवी मुंबई, पनवेलकडे जाण्यासाठी वाहनचालकांना तासन् तास खोळंबून राहावे लागणार नाही, असे सांगण्यात आले.
(जोड बातमी आहे )
.........
वाचली