भाजपतर्फे तृतीयपंथी, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:58+5:302021-07-29T04:39:58+5:30
अंबरनाथ : शहरातील भाजपतर्फे प्रदेश सचिव व माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीयपंथी व महिलांच्या आत्मसन्मानासाठी ...
अंबरनाथ : शहरातील भाजपतर्फे प्रदेश सचिव व माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीयपंथी व महिलांच्या आत्मसन्मानासाठी व स्वयंपूर्णतेसाठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्वेतील स्वानंद हॉल येथे हे शिबिर झाले. त्याचे आयोजन भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रोजलीन फर्नांडिस, युवती अध्यक्ष रूपाली लठ्ठे व संघटन सरचिटणीस दिलीप कणसे यांनी केले होते. या शिबिराला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. तृतीयपंथीयांना केक बनविणे, क्राफ्ट व आर्टिफिशियल फुले बनविणे, मेणबत्ती बनविणे, मेंदी डिझाइन, पेपर बॅग बनविणे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर, तृतीयपंथीयांनी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
शहरातील कर्तृत्ववान महिलांचा वाघ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले, तर शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील यांनी भाजप तृतीयपंथी आघाडीची स्थापना केली असून, पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
--------------