भिवंडी शहरवासीयांची तहान भागणार; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:58 PM2021-02-09T17:58:04+5:302021-02-09T17:58:10+5:30
अखेर मुंबई महानगर पालिकेने आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दाखविल्याने भिवंडी शहराला आता २ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा प्रतिदिन होणार आहे.
नितिन पंडीत
भिवंडी ( दि . ९ ) भिवंडी शहरातील तीव्र पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी बृहमुंबई महानगर पालिकेकडे भिवंडी शहरासाठी अतिरिक्त २ दशलक्ष लिटर पाण्याची वेळोवेळी मागणी केली होती . त्यासाठी आमदार शेख यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबत अनेक बैठकादेखील आयोजित केल्या होत्या .
अखेर मुंबई महानगर पालिकेने आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दाखविल्याने भिवंडी शहराला आता २ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा प्रतिदिन होणार आहे. या अतिरिक्त पाणी मंजुरीमुळे शहरातील सायरा नगर , वकील कंपाउंड , फातिमा नगर , ६० फिट रॉड परिसर , उम्मत नगर , मन्सूरबाद , गायत्री नगर चौक , राम नगर , चवींद्र डम्पिंग ग्राउंड झोपडपट्टी , गायत्री नगर पहाडी , फौजी पीर दर्गा , नुरी नगर , डोंगर पाडा , आझाद नगर , न्यू आझाद नगर , आला हजरत चौक येथील रहिवासींची पाणी समस्या सुटणार आहे . विशेष म्हणजे या पाणी वाटपाचे सुनियोजन व्हावे यासाठी आमदार रईस शेख यांच्या स्थानिक आमदार निधीतून तब्बल ३० लाख रुपयांची निधी देखील मंजूर केली आहे .
सदर योजना व पाण्याचे योग्य नियोजन यासंदर्भात मंगळवारी आमदार शेख यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस बृहमुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता राठोड , भिवंडी मनपाचे शार अभियंता एल डी गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते . दरम्यान भिवंडी संहारासाठी मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करणे हे माझे ध्येय असून त्याकरिता मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे .