भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

By सुरेश लोखंडे | Published: October 28, 2018 04:37 PM2018-10-28T16:37:29+5:302018-10-28T17:01:00+5:30

गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत.

Thirty crore water supply schemes in Thane district of Chakravyuh of Corruption; 32 cases filed against them | भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देकेवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेतभ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या


ठाणे : जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षापासून भ्रष्टाचा-याचे कुरण ठरल्या. करोडो रूपयांच्या या योजनांमधील भ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ही दाखल झाले. आतापर्यंत केवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. रखडलेल्या योजनांमुळे गावखेड्यातील रहिवाशी आजपर्यंत च्या पाणी पुरवठ्यापासून वंचित आहेत. यास जिल्हा परिषदेचा दुर्लक्षितपणाही कारणी भूत असल्याचे बोलले जात आहे.
पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी या योजना हाती घेतल्या होत्या. जागतिक बँकेचे अर्थ सहाय्य असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या. आता या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ‘राष्टÑीय ग्रामीण पेयजल ’ असे नामकरण झाले. सुमारे दहा वर्षाच्या कालावधीपासून सुरू असलेल्या ४९८ या पाणी पुरवठा योजनांसह १३७ विहिरींची कामे भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अर्धवट रखडलेली आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या कामांची आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरूती स्थानिक ग्राम पंचायतींच्या नळपाणी पुरवठा समितीने करायची असल्यामुळे त्यात मोठ्याप्रमाणात करोडोचा भ्रष्टाचार झाला. दरम्यानच्या काळात समित्यांचे पदाधिकारही बदली झाले. यामुळे अर्धवट स्थितीत राहिलेल्या योजनांची काम अद्याप ठिकठिकाणी सुरू आहेत.
गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत. या योजनांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार मुरबाड तालुक्यात झाला. यामुळे संबंधीत ग्राम पंचायतींचे तत्कालीन सरपंचासह समिती सदस्य आदीं २८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाले. या तालुक्यात १७६ योजना हाती घेतल्या. पण दहा वर्षाच्या कालावधीत केवळ ४२ योजनांव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित ३८ योजनांचे काम पूर्ण झाले. तर ३२चे कामे अर्धवट असून २८ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. १२ विहिरीची कामे हाती घेतली असता नऊचे काम पूर्ण असून तीन विहिरी अर्धवट आहेत.
शहापूर तालुक्यातील तीन जणांवर गुन्हा नोंद झाले. दोन योजना रद्द कराव्या लागल्या. १३३ योजनांपैकी ३९ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. २१ योजनांची कामे पूर्ण झाली. तर ४३ योजनां किरकोळकामांमुळे अर्धवट असल्याचे सांगितले जात आहे. अंबरनाथ तालुक्यात ४४ योजना घेतल्या त्यापैकी केवळ चार योजना आजमितीस पाणी पुरवठा करीत आहेत. २६ योजनांचे कामे पूर्ण झाल्याचा दावा आहे तर १२ योजनांची किरकोळ अर्धवट कामे बाकी आहेत. कल्याणमध्येही ३२ योजनांपैकी चार योजनांचा पाणी पुरवठा आहे. उर्वरित पाच अर्धवट असून २३ योजनांची कामे पूर्ण झाली.
** २८ कोटींचा निधी पडून - रखडलेल्या योजनांची काम कालबध्द पध्दतीने पूर्ण करण्यात आहेत. यानुसार गेल्या वर्षी म्हणजे २०१७ -१८ ला २४ कामांचे उद्दीष्ठ हाती घेतले. त्यासाठीचे २८ कोटी ९१ लाखाची तरतूदही केली. पण केवळ ११ योजनांची कामे झाली. वर्षभरात केवळ पाच कोटी ६० लाख रूपयांचा खर्च ग्रामीण पाणी पुरवठा विभागास करता आला. यंदाही १३ कोटी ३५ लाखांची १३ कामे हाती घेतली आहेत . त्यातील जूनपर्यंत एक योजना पूर्ण होऊन २४ लाखांचा खर्च झाल आहे. या आॅक्टोबरमध्ये ११ कामे पूर्ण होणार असल्यचे सांगितले जात आहे.

Web Title: Thirty crore water supply schemes in Thane district of Chakravyuh of Corruption; 32 cases filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.