ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 03:17 AM2018-10-21T03:17:47+5:302018-10-21T03:17:55+5:30
ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे.
- शशिकांत ठाकूर
कासा : ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे. बुधवारी तीन पिडीतांनी पोलिसांत तक्रार केली होती. आणखी १२ युवकांनी सोमवारी तक्रार केली असून फसवणूक केलेली रक्कम ३९.८० लाखांवर गेली आहे. पाच आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहे
ठाणे महानगरपालिकेत आपण नोकरी लावून देतो असा बनाव करून हे पाच आरोपी बेरोजगारांना ३ लाख रूपये घेऊन बनावट नेमणूक पत्र, ओळख पत्र तयार करून देत. त्या पैकी सागर व अंकुश घुटे हे दोघे बेरोजगार आदिवासी तरु णांना हेरत असत आणि उर्वरित तिघेजण त्यांना नोकरी देतो पण त्यासाठी ३ लाख रूपये द्यावे लागतील अशी बतावणी करीत असत. रक्कम मिळाल्यावर त्यांना बनावट नियुक्ती पत्र, ओळख पत्र तयार करून देत. असत. प्रत्यक्षात नेमणूक न झाल्यावर फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर काही तरु णांनी पैसे मागणीसाठी तगादा लावला असता त्यांना दिलेले चेक खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले.
हे तरुण गरीब व शेतकरी कुटुंबातील आहेत.त्यांनी सदर रक्कम नातेवाईक मित्राकडून उसनवारी करून नोकरीसाठी जमा केल्याचे सांगितले. दरम्यान तरु णांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कासा पोलिसांनी आरोपी सागर शशिकांत घुटे,जयवंत अर्जुन खोटरे, उत्तम लिंबाजी मोरे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.उर्वरीत दोन आरोपींचा शोध कासा पोलीस घेत आहेत.
>यांची झाली घोर फसवणूक, कांडाची व्याप्ती ठाणे आणि पालघर जिल्ह्यात
त्यामध्ये शैलेश भोये (३ लाख) कळमदेवी, संतोष यादव (३ लाख) कासा, राहूल विष्णू घुटे रा भवाडी (२ लाख) पूनम भोये आष्टा, (१ लाख ५० हजार), धर्मेंद्र चौधरी (२ लाख ५० हजार) रायपूर, अनिल माहला रायपूर, (२ लाख ७० हजार) सर्व ता. डहाणू , शालिनी मडवी भार्इंदर (२ लाख ३० हजार), प्रदीप चौरे, (३ लाख) दिलीप चौरे (३ लाख ५० हजार) उमेश मळेकर (३ लाख) , कल्पेश गोवारी ,ब्राह्मणपाडा (२ लाख), सर्व मानिवली , वाडा , मोहन भोरे ( २ लाख ७० हजार) .केळघर ता मोखाडा, बलराम कृष्णा भुसारा (२ लाख ६० हजार) चांभारशेत, जव्हार अश्विनी जाधव( 3 लाख ), दिनेश कवटे (३ लाख) कवडास , विक्र मगड,