ठाण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग कोसळून माय लेकी जखमी, तीन कारचेही झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 04:25 PM2018-02-21T16:25:01+5:302018-02-21T17:33:59+5:30
खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली कोसळल्याने रिक्षातून जाणा:या माय लेकी यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तीन कारचे देखील यात नुकसान झाले आहे.
ठाणो - खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या असलेल्या न्यु कॅप्टन इमरातीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीची भिंतीचा काही भाग कोसळून माय लेकी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 18 महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहे. तर भिंतीचा हा भाग खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने तीन कारचे देखील नुकसान झाले आहे.
खारकळ आळी एनकेटी कॉलेजच्या बाजूला न्यू कॅप्टन ही तळ अधिक 4 मजल्यांची इमारत आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये सात कुटुंबाचे वास्तव्य होते. दुपारी 2.30 च्या सुमारास या इमारतीच्या तिस:या मजल्याच्या गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली उभ्या असलेल्या तीन कारवर पडला. यात या तीनही कारचे नुकसान झाले आहे. तसेच येथून रिक्षातून जाणा:या माय लेकींवर देखील याचा काही भाग पडला. यामध्ये देखील्किर्ती सकपाळ (24) यांच्या डोक्याला, खांद्याला दुखापत झाली आहे. तर त्यांची 18 महिन्यांची कन्या नेहा सकपाळ ही देखील यात जखमी झाली असून तिच्या देखील डोक्याला दुखापत झाली असून तिला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीवीतहानी झाली नसली तरी रिक्षातून जाणारी एक शाळकरी चिमरुडी यात किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ही इमारती रिकामी करण्यात आली असून पालिका ती इमारत तोडण्याची कारवाई करणार आहे.