ठाणे जिल्ह्यातील साडेसात लाख नागरिक आधार नोंदणीपासून वंचित
By admin | Published: June 14, 2017 03:17 PM2017-06-14T15:17:32+5:302017-06-14T15:17:32+5:30
मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु,
राजू काळे/ ऑनलाईन लोकमत
भार्इंदरस दि.14 - मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, एप्रिलपासुन तांत्रिक कारणास्तव सर्व आधार केंद्र बंद करण्यात आल्याने एकट्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख लोकं आधार नोंदणीपासुन वंचित राहिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतुन समोर आले आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन विद्यार्थ्यांची ऐन शाळा सुरु होण्याच्या कालावधीत चांगलीच पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधार कार्ड शाळेतील विद्यार्थ्यांसह वृद्धांपर्यंत सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा ४ ते ७ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसुन येत नसल्याने त्यांची आधार नोंदणी करण्यात येत नव्हती. अखेर त्यांच्या नावासह केवळ छायाचित्राचा समावेश असलेली आधार नोंदणी सुरु करण्यात आली. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची करुन त्यांच्या ओळखपत्राची मागणी पालकांकडे करण्यात येऊ लागली आहे. एप्रिलपर्यंत सुरु असलेली आधार नोंदणी अचानक बंद करण्यात आल्याने नागरीकांची पंचाईत झाली. त्यात नोंदणीसाठी वापरण्यात येणाय््राा संगणक प्रणालीचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. त्याला संबंधित कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी आधार नोंदणीचे काम करणाय््राा मेसर्स पिपल सर्विसेस टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीने आधार नोंदणी करणाय््राा सर्व एजन्सींचे काम बंद केले. गेल्या एप्रिल महिन्यापासुन आधार नोंदणी बंद पडली आहे. यामुळे अद्याप आधार नोंदणी न झालेल्या लोकांकडे त्यांचे खाते असलेल्या बँकेकडुन आधार कार्डची मागणी केली जात आहे. आधार कार्ड वेळेत सादर न केल्यास त्यांचे बँकेतील व्यवहार रोखण्याचा इशारा बँकेकडुन देण्यात आला आहे. तसेच रेशनकार्डसोबत आधार संलग्न करण्यासाठी देखील पुरवठा कार्यालयाकडुन आधार कार्डची मागणी केली जात असुन त्याची प्रत निश्चित वेळेत जमा न केल्यास रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणी न केलेल्या गरीब व सामान्य कुटुंबाची परवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील आधारची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यासाठी केवळ १ दिवसाचा अवधी असताना वंचित विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २०१५ मधील ८५ लाख २९ हजार २१७ इतक्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ७७ लाख ७९ हजार १२७ लोकांनी आधार नोंदणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासनांना पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. अद्याप ७ लाख ५० हजार ९० लोकं आधार नोंदणीपासुन वंचित असुन त्यांच्यासाठी त्वरीत आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया
राज्य ग्राहक सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे : आधार हे भविष्यात एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याने प्रत्येकाला आधार नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी त्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत.
पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुधीर राऊत : नागरीकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद पडलेली आधार नोंदणी सुरु करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाणार आहे.