कॅरम खेळू न दिल्यानेच ठाण्यातील जळीतकांड?, कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:55 AM2017-09-19T04:55:47+5:302017-09-19T04:55:49+5:30
कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरुवातीला या आगीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सुब्रमण्यम मुदलीयार आणि योगेश कार्ले यांनी सांगितले होते. नंतर मात्र त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या सोसायटीतील मंदार साटम (२०) आणि शांतीनगर येथील अनिकेत शिंदे (२२) या दोघांनी कॅरम खेळण्यासाठी सोसायटीच्या व्यायामशाळेची चावी मागितली होती. मात्र, व्यायामशाळेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, त्यांनी चावी देण्यास नकार दिला. यातूनच या दोघांनी रहिवाशांना जमा करून, काही काळ गोंधळही घातला होता. त्यांनीच आग लावून गाड्या जाळल्याचा संशय सुब्रमण्यम मुदलीयार यांनी या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. त्यानुसार, आता साटम आणि शिंदे या दोघा संशयितांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.