हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत
By अजित मांडके | Published: February 9, 2024 02:31 PM2024-02-09T14:31:24+5:302024-02-09T14:31:33+5:30
उदय सामंत यांची टिका
ठाणे : मॉरिस याच्या अनेक बॅनर मध्ये उबाठा गटाचे पक्षप्रमुख आणि उबाठाचे युवनेता यांच्या मार्गर्शनाखाली मला काम करायचे आहे असे त्याने म्हंटले होते. गुरुवारी झालेले गँगवार हे उबाठा गटाचे आहे. नगरसेवक मी होणार की तू होणार, एकमेकातील स्पधेर्मुळे हा प्रकार झालेला असल्याची टिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. परंतु असा प्रकार घडणे हे दु्दैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु विनाकारण मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसर येथे मॉरिस नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह करत गोळीबार केला होता. या गोळीबारात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर मॉरिस याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मॉरिस याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहेत. याविषयी खुलासा करण्यासाठी उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाºया मॉरिस याचे उदात्तीकरण सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी त्याचे वृत्त देखील माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. असा प्रकार घडणे हे दु्दैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. परंतु काहीजण राजकारण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करत आहेत. ही प्रवृत्ती वाढत आहे. या प्रकारचा आम्ही निषेध करतो. मॉरिस याला मोठे करण्याचे काम सामना मधून, तर घोसाळकर यांच्या सामाजिक कायार्ला मातोश्री मधून असल्याचे स्पष्ट होत आहे. एखादी वाईट घटना घडली तर ती शिंदे यांच्यामुळे घडली आणि एखादी चांगली घटना घडली तर ती आम्ही यापूर्वी केली अशा प्रकारची भूमिका काही लोक राजकारणात मांडत आहेत असा आरोपही त्यांनी केला. मॉरिस हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. त्यापेक्षा घोसाळकर हे हा प्रकार घडण्यापूर्वी कोणाला भेटले. याचा देखील तपास व्हायला हवा. फेसबुक लाइव्ह मध्ये तडजोड झाली त्यामागे कोण होते. हे जनतेसमोर आले पाहिजे असेही सामंत म्हणाले