यंदाचा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर, अभिनेत्री लीना भागवत यांना 'गंगा-जमुना पुरस्कार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 15:52 IST2025-02-10T15:50:46+5:302025-02-10T15:52:33+5:30

रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे प. येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे.

this year janakavi p savalaram memorial award has been given to veteran actor uday sabnis and actress leena bhagwat has been awarded the ganga jamuna award | यंदाचा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर, अभिनेत्री लीना भागवत यांना 'गंगा-जमुना पुरस्कार'

यंदाचा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर, अभिनेत्री लीना भागवत यांना 'गंगा-जमुना पुरस्कार'

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर 'गंगा-जमुना पुरस्कार' अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झाला आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे प. येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सन २०२४चा 'जनकवी पी. सावळाराम पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना देण्यात येणार असून रु. ७५ हजार रुपये सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, गंगा –जमुना पुरस्कार' अभिनेत्री लीना भागवत यांना देण्यात येणार असून त्याचे स्वरुप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे.

त्याचबरोबर, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: this year janakavi p savalaram memorial award has been given to veteran actor uday sabnis and actress leena bhagwat has been awarded the ganga jamuna award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे