'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 18, 2022 06:20 PM2022-10-18T18:20:31+5:302022-10-18T18:21:54+5:30

मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 

This year's Gandhar Gaurav Award has been announced for Marathi superstar Sachin Pilgaonkar  | 'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

Next

ठाणे: मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे दिली. पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. 

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी गोखले आणि अभिनेत्री हेमांगी वेल्हणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते. 
 
कलेच्या उद्यानात मुक्त विहार करणारे कलानंदी व्यक्तिमत्त्व म्हणजे पिळगावकर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्यात कलेचा आनंद घेण्याची वृत्ती आहे - विजय गोखले
 
गंधार गौरव पुरस्कार 2022 नॉमिनेशन 
(नाटकांची नावे )
नेपथ्य 

1.गोष्टीची गोष्ट 2 जीर्णोद्धार 3विष्णुदास भावे 4रिले 1.0

प्रकाश योजना 
1. गोष्टीची गोष्ट 2. तायडी जेव्हा 3.बदलते पक्षांचे कवी संमेलन

रंगभूषा 
1. पक्ष्यांचे कवी संमेलन 2.गोष्टीची गोष्ट 3. तायडी जेव्हा बदलते

वेशभूषा 
१. गोष्टीची गोष्ट २.पक्षांचे कवी संमेलन ३.वयम मोठम खोटम

पार्श्वसंगीत 
1. पक्ष्यांचे कवी संमेलन 
२.जीर्णोद्धार 
३. आमची काय चूक

लेखक 
1. गोष्टीची गोष्ट २. जीर्णोद्धार ३.  लहान मुलांची बाप गोष्ट ४. लाभले आम्हास भाग्य

दिग्दर्शक 
1. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन 3. तायडी जेव्हा बदलते

बालकलाकार मुलगा
1. शर्व दाते,
2. आरव कांबळे, 
3. चैतन्य चव्हाण

बालकलाकार मुलगी
१.अस्मि गोगटे 
२. भैरवी जोशी 
३. कस्तुरी खैरनार

बालनाट्ये
१. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन ३. जीर्णोद्धार


 

Web Title: This year's Gandhar Gaurav Award has been announced for Marathi superstar Sachin Pilgaonkar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.