ठाण्यात रंगणार कोकण प्रांतस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा; विजयकुमार गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 27, 2022 05:14 PM2022-10-27T17:14:52+5:302022-10-27T17:16:22+5:30
या वर्षीची कोकण प्रांतृस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे: वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आयोजित या वर्षीची कोकण प्रांतृस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा ठाण्यातील थिराणी शाळेत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्पर्धा २९ ते ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेती मेघाली कोरगावकर, तिरंदाजी प्रशिक्षक पंकज आठवले, तर बक्षीस समारंभ साठी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गुरूवारी सहसचिव रमेश वांद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण प्रांतातील ठाणे, पालघर, शहापूर, रायगड, कुलाबा अशा ५ जिल्ह्यातील जनजाती मुलांच्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा यामधून विजयी झालेले एकूण १७५ खेळाडू या प्रांतस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रांत स्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना वाराणसी, उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. या एकलव्य खेलकूद स्पर्धेचे ठिकाण सावित्रीबाई थीराणी विद्यामंदिर, वर्तक नगर आहे असे वांद्रे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रशिक्षक रत्नमाला डहाके तर वनवासी कल्याण आश्रमाचे उल्हास कार्ले आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"