शहरातील 'त्या' खाजगी रुग्णालयांना ऑगस्टपर्यंत मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:30 PM2021-05-19T18:30:58+5:302021-05-19T18:31:21+5:30

thane : ठाणे महापालिकेच्या अग्निशन विभागाने शहरातील ३४७ रुग्णांलयांना पुन्हा नोटीस बजावल्या असून अग्निसुरक्षा सक्षम करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आता राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर फायर एनओसी नसली तरी ३१ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी असे स्पष्ट केले आहे.

The 'those' private hospitals in thane, got relief till August | शहरातील 'त्या' खाजगी रुग्णालयांना ऑगस्टपर्यंत मिळाला दिलासा

शहरातील 'त्या' खाजगी रुग्णालयांना ऑगस्टपर्यंत मिळाला दिलासा

Next
ठळक मुद्देबुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.

ठाणे  :  मुंब्य्रातील प्राईन क्रिटीकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर शहरातील खाजगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली होती. ठाणे महापालिकेच्या अग्निशन विभागाने शहरातील ३४७ रुग्णांलयांना पुन्हा नोटीस बजावल्या असून अग्निसुरक्षा सक्षम करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आता राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर फायर एनओसी नसली तरी ३१ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी असे स्पष्ट केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे  महापालिकेने देखील बी फॉर्मच्या आधारावर या रुग्णालयांना तूर्तास ऑगस्ट २०२१ पर्यंत दिलासा दिला आहे.

बुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील खाजगी रुग्णालयाच्या परवानगीबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, फायर एनओसीसाठी काही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे का? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान ठाणे  शहरामध्ये सरकारी तसेच पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास आहे तर एकूण ४३७ रुग्णालये शहरात आहेत. मुंब्य्रातील रुग्णालय दुर्घटनेनंतर शहरातील सर्व रुग्णालयांना पुन्हा नोटीसा बजावत अग्निसुरक्षा सक्षम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामध्ये २८२ रु ग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असल्याचे तर, ६५ रु ग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. 

या ६५ रुग्णालयांना नोटीसा बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. मात्र त्याकडे या रु ग्णालयांनी अद्यापही दुर्लक्ष केल्याचे समोर आले होते. परंतु आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अशा रुग्णालयांना आता राज्य शासनानेच ३१ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. त्याचाच आधार घेत ठाणे  महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील शहरातील अशा रुग्णालयांना फायर एनओसी नसली तरी देखील बी फॉर्मच्या आधारावर ३१ ऑगस्ट २०२१ र्पयत परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: The 'those' private hospitals in thane, got relief till August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.