‘त्या’ विद्यार्थिनीच झाल्या शिक्षिका; गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:39 PM2020-09-07T23:39:59+5:302020-09-07T23:40:10+5:30
आई-वडिलांना शेतात मदत करून विद्यादान
विक्रमगड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा तसेच वसतिगृह बंद असल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींकडून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
शासनाने अन्लॉक लर्निंग कार्यक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह विक्रमगड येथील गृहपाल विद्या शिरसाट व सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनीसोबत गुगल मीट अॅपद्वारे आणि प्रत्यक्षात विद्यार्थिनींशी मोबाईलवर संपर्क साधून तसेच गावात भेटी देऊन अन्लॉक लर्निंगविषयी माहिती दिली जात आहे.
आई-वडिलांना शेताच्या कामात मदत करून विद्यार्थिनी दीपाली भडांगे, सुजाता भडांगे, योगिता गावित, प्रणिता गावित, सिद्धी कडू, गीता हरपाले, प्रीती थोरात, निकिता तारवी, सोनाली डोंबरे, मीना जाधव, शेवते, सुजाता गावित या विद्यार्थिनींनी व्हॉलेंटिअर टिचर्स म्हणून भूमिका बजावत आपल्या गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थिनींच्या या उपक्र मास गावातील लोकांची चांगली साथ मिळत असल्याची माहिती विद्या शिरसाट यांनी दिली.