‘त्या’ शिक्षकांकडून मागवला खुलासा, भाईंदरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:31 AM2017-08-12T05:31:22+5:302017-08-12T05:31:22+5:30

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील हिंदी शाळेत वर्ग सोडून खाजगी कामासाठी बाहेर जाणे, मुलांना दमदाटी करणे, विद्यार्थीच शिकवत असल्याची बातमी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली.

 'Those teachers' were asked to disclose, type in Bhaindar | ‘त्या’ शिक्षकांकडून मागवला खुलासा, भाईंदरमधील प्रकार

‘त्या’ शिक्षकांकडून मागवला खुलासा, भाईंदरमधील प्रकार

Next

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील हिंदी शाळेत वर्ग सोडून खाजगी कामासाठी बाहेर जाणे, मुलांना दमदाटी करणे, विद्यार्थीच शिकवत असल्याची बातमी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. प्रशासन अधिकारी यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असून मुख्याध्यापक, शिक्षकांना खुलासा करण्यास सांगितले आहे.
मीरा- भार्इंदर महापालिकेचा शिक्षण विभाग व शाळांमधील अनागोंदी कारभारामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असून भ्रष्टाचार बोकाळला आहे. पालिकेच्या उपशिक्षकास शिक्षिकेडूनकडुन लाच घेताना अटक झाल्यावर आणखी काही शिक्षकांकडूनही पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ, बदली, फरक मिळणे आदींसाठी पैसे उकळण्यात आल्याचे आरोप होऊ लागले.
भार्इंदर पश्चिमेच्या शाळा क्र. ३० या हिंदी माध्यमाच्या शाळेत तर मुख्याध्यापक अरुण सिंह व शिक्षक अनिल मिश्रा शाळेच्या वेळात खाजगी कामासाठी गेले होते. तर शशीभूषण व ममता यादव एकाच वर्गात बसले होते. अन्य ३ वर्गात कुणीही शिक्षकच नव्हते. एका वर्गात विद्यार्थीच मुलांना शिकवत होता. तर तिवारी हे अधूनमधून अन्य वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मारण्याची धमकी देत दमदाटी करत होते.
‘लोकमत’ने हा सर्व प्रकार उघड केल्यावर खळबळ उडाली. पालिकेच्या अन्य शाळांमध्ये देखील काही बेजबाबदारपणा करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले. प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांना चांगल्याच कानपिचक्या देत खुलासा मागवला आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी खाजगी कामासाठी जाऊ नये अशी तंबी दिली. खुलासा आल्यावर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.

शिक्षकांना निलंबित करा

दरम्यान, कामचुकार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जगदंब प्रतिष्ठानचे सुलतान पटेल यांनी केली आहे.
पालिका शाळांमधून
शिकणाºया गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार बंद झाला नाही तर अधिकाºयांविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title:  'Those teachers' were asked to disclose, type in Bhaindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.