‘त्या’ स्वागतकमानी विनापरवानगी उभारल्या
By admin | Published: October 15, 2016 06:38 AM2016-10-15T06:38:49+5:302016-10-15T06:38:49+5:30
नवरात्रोत्सवानिमित्ताने गायत्रीनगरमध्ये विनापरवानगी कमानी उभारल्या होत्या, असा गौप्यस्फोट प्रभाग समिती क्रमांक-१ चे सहायक आयुक्त अशोक लाडकर
पंढरीनाथ कुंभार / भिवंडी
नवरात्रोत्सवानिमित्ताने गायत्रीनगरमध्ये विनापरवानगी कमानी उभारल्या होत्या, असा गौप्यस्फोट प्रभाग समिती क्रमांक-१ चे सहायक आयुक्त अशोक लाडकर यांनी केल्याने या घटनेला वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, गायत्रीनगर पोली चौकीवर हल्ला करुन पोलीस उपनिरीक्षकाची दुचाकी जाळल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहरमनिमित्ताने किती ताजिया व पंजे बसले व किती परवानगी व विनापरवानगीचे आहेत, याची खातरजमा पोलिसांनी न केल्याने नियंत्रण कक्ष व विशेष शाखा यांच्यातील आकडेवारीत फरक आढळून येतो. त्यामुळे मन्सुरनगर व फातिमानगर येथून निघणाऱ्या ताजिया व पंजांची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यास नव्हती. त्यानुसार, या मिरवणुकीस पुरेसा बंदोबस्त दिलेला नव्हता. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
गुरुवारी सायंकाळपर्यंत मन्सुरबाग व फातिमानगर येथून ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींची नावे, आकडेवारी रात्री ९ पर्यंत पोलीस नियंत्रण कक्ष व शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना देता आली नाही.
सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावताना त्यावर महापालिकेचा परवानगी क्रमांक, ठिकाण व मुदत ठळकपणे लिहिली पाहिजे. त्याचप्रमाणे बॅनर प्रिंटिंग करणाऱ्याचे, प्रकाशकाचे नाव बॅनरवर
छापलेले नसल्याचे आढळल्यास पोलिसांनी अशा बॅनरवर कारवाई करावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, अशी माहिती परवाना विभागप्रमुख ईश्वर आडेप यांनी दिली. बॅनर किंवा स्वागतकमानीस नियमानुसार फी घेऊन खाजगी व्यक्तीस, मंडळांना परवानगी दिली जाते असेही त्यांनी सांगितले.