ठाण्यात नो पार्र्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना टोर्इंग दरवाढीचाही ‘फटका’ बसणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:46 PM2020-12-30T22:46:20+5:302020-12-30T22:54:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नो पार्र्किं गध्ये वाहने लावणाऱ्यांना आता ‘नो पार्र्किं ग’च्या दंडाबरोबरच टोर्इंग दरवाढीचाही नविन वर्षामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नो पार्र्किं गध्ये वाहने लावणाऱ्यांना आता ‘नो पार्र्किं ग’च्या दंडाबरोबरच टोर्इंग दरवाढीचाही नविन वर्षामध्ये फटका सहन करावा लागणार आहे. दहा वर्षांनी म्हणजे २०१० नंतर प्रथमच ही दरवाढ प्रस्तावित असून त्याचे नेमकी दर निश्चित झाले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
टोर्इंग व्हँनच्या माध्यमातून ‘नो
पार्र्किं ग’मध्ये उभ्या केल्या जाणाºया वाहनांवर कारवाई केली जाते. या कारवाईत वाहनांच्या टोर्इंग करण्यासाठी आकारल्या जाणाºया दंडाच्या रकमेत गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही वाढ केलेली नव्हती. या दंडात्मक कारवाईसाठी होणाºया खर्चातही वाढ होत असून त्यातून जमा होणाºया महसूलावर जीएसटीचाही भरणा करावा लागतो. त्यामुळे ही दंडात्मक रक्कम वाढविण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने घेतला आहे. ही रक्कम मुंबई आणि पुणे शहरांत आकारल्या जाणाºया दंडापेक्षा कमी राहणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सध्या नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाºयांकडून शंभर रुपये टोर्इंग शुल्क तर दंडापोटी २०० रुपये आकारले जातात. मोटारकार चालकाकडून २०० रुपये टोर्इंग शुल्क आणि दोनशे रुपये दंडाचे असे ४०० रुपये आकारले जातात. यापुढे कार चालकाला आणि २०० पेक्षा अधिक आणि दुचाकी चालकाला १०० पेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या टोइंगसाठी जीएसटीसह सह अधिकचे रु पये आकारले जाणार आहेत. या वाढीव दरामध्येच टोर्इंग व्हॅनवरील मुलांचे वेतन, कारवाईच्या वेळी होणारे व्हिडिओ चित्रण आणि कारवाईच्या आधी ध्वनीक्षेपकावरुन उद्घघोषणा करणे आदी सुविधाही या टोर्इंग चालकाकडून पुरविण्यात येणार आहेत. मुळात, अशा दंडासह वाढीव दराचा कोणताही फटका बसण्यापेक्षा चालकांनी आपले वाहन योग्य ठिकाणी उभे करावेत. ते नो पार्र्किं गच्या ठिकाणी उभे करु नये, असे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे.
‘‘दहा वर्षांनी होणारी टोर्इंगच्या दरात वाढ प्रस्तावित असली तरी ती मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत निश्चितच कमी राहणार आहे. ती वाढ किती होईल, याचे दर अजून निश्चित झाले नाहीत.’’
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर