हजारो नागरिक आजही विना‘आधार’
By admin | Published: January 28, 2017 02:39 AM2017-01-28T02:39:49+5:302017-01-28T02:39:49+5:30
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत आधारकार्ड सक्तीचे करून प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारून आधारकार्ड देण्याचा सपाटाच लावला. मात्र,
भातसानगर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत आधारकार्ड सक्तीचे करून प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारून आधारकार्ड देण्याचा सपाटाच लावला. मात्र, तरीही शहापूर तालुक्यात हजारो नागरिक आजही आधारकार्डविनाच आहेत.
सर्व शासकीय सुविधा या आधारकार्ड नसेल तर मिळणार नसल्याने अनेकांनी ती काढून घेतली. मात्र, यासाठी मुळात त्या कार्यालयापर्यंत जाणेच खर्चिक होते. त्याच वेळी गावागावांत, खेड्यापाड्यांतील शाळांत जाऊनही आधारकार्ड काढून देणे आवश्यक असताना ती न दिल्याने आज तालुक्यातील हजारो नागरिक आधारकार्ड काढून घेण्यापासून वंचित आहेत. तर, खाजगीतून आधारकार्ड काढण्यासाठी त्यांना २०० ते ३०० रु पये मोजावे लागतात.
शहापुरात मोफत आधार काढण्याचे काम तालुक्यात सुरू होते. तेव्हा शासकीय कर्मचारी, स्थानिक नागरिक यांची गर्दी या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होती. ही केंद्रे कधी वासिंद, डोळखांब, कसारा तर कधी अन्य ठिकाणी फिरती असल्याने नागरिकांची ओढाताण होत होती. नंतर काढू, अशा विचारात असताना ही केंद्रे कधी गायब झाली, हेच नागरिकांना कळले नाही. त्यामुळे आता आधारकार्डासाठी त्यांची वणवण सुरू आहे. (वार्ताहर)