वर्षाला हजार तक्रारी निकाली, नव्या तक्रारींमुळे दावे प्रलंबित, आज राष्ट्रीय ग्राहक दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:53 AM2017-12-24T03:53:37+5:302017-12-24T03:53:47+5:30

विविध कंपन्या, आस्थापनांकडून फसवणूक झालेल्या आणि त्याबाबत मंचाकडे दाद मागणाºया ग्राहकांचे प्रश्न जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोडवत असतो. २०१७ च्या वर्षअखेरीस ठाणे ग्राहक मंचात आजपर्यंतच्या सुमारे ३५०० तक्रारी प्रलंबित आहेत.

Thousands of complaints were received annually, claims pending due to new complaints, National Consumer Day today | वर्षाला हजार तक्रारी निकाली, नव्या तक्रारींमुळे दावे प्रलंबित, आज राष्ट्रीय ग्राहक दिवस 

वर्षाला हजार तक्रारी निकाली, नव्या तक्रारींमुळे दावे प्रलंबित, आज राष्ट्रीय ग्राहक दिवस 

Next

- स्नेहा पावसकर

ठाणे : विविध कंपन्या, आस्थापनांकडून फसवणूक झालेल्या आणि त्याबाबत मंचाकडे दाद मागणाºया ग्राहकांचे प्रश्न जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोडवत असतो. २०१७ च्या वर्षअखेरीस ठाणे ग्राहक मंचात आजपर्यंतच्या सुमारे ३५०० तक्रारी प्रलंबित आहेत. २०१७ मध्ये नव्याने सुमारे १००० तक्रारी मंचात दाखल झाल्या असून तितक्याच अर्थात ९०० ते १००० तक्रारी निकाली काढण्यात मंचाला यश आले आहे.
सदनिकाखरेदी, इन्शुरन्स पॉलिसी, मोबाइल, फ्रीज, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉस्पिटल, कॉलेजेसशी व्यवहाराच्या प्रकरणात ग्राहकांना फसवले जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी काही ग्राहकांना पुरावे गोळा करणे, कागदपत्रांचा व्यवहार, न्यायालयात उपस्थित राहणे, या गोष्टी कटकटीच्या आणि वेळकाढू वाटल्याने ते ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार पुढे चालवत नसत. मात्र, आता ग्राहक सजग होत असून अशा कंपन्यांविरोधात अधिकाधिक तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत आणि दाखल होणाºया तक्रारी सोडवून ग्राहकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कायम प्रयत्नशील असतो. २०१६ च्या अखेरीस प्रलंबित तक्रारी २७०० इतक्या होत्या. नवीन ११०० तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर, सुमारे १३०० तक्रारी निकाली काढल्या होत्या. यंदा २०१७ च्या अखेरीस सुमारे ३५०० इतक्या तक्रारी प्रलंबित असून सुमारे ९५० तक्रारी निकाली काढलेल्या आहेत.
एका महिन्याला अधिकाधिक तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, त्या तुलनेत नवीन तक्रारींची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रलंबित तक्रारींची संख्या कमी होत नाही. उलट, वाढतच असल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली.

Web Title: Thousands of complaints were received annually, claims pending due to new complaints, National Consumer Day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.