श्रीक्षेत्र टाकीपठार येथे हजारो भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:40 AM2019-01-11T05:40:34+5:302019-01-11T05:40:56+5:30
२० हजार भाविकांची उपस्थिती : उपक्रमशील सत्संग केंद्रांचा गौरव
किन्हवली : तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यातील गावागावांतून आलेल्या दिंड्या, राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि हजारो सत्संगप्रेमींच्या हर हर महादेव अशा गर्जनांनी शहापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थान रविवारी भक्तिरंगात रंगून गेले होते. निमित्त होते ब्रह्मलीन योगी ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनाचे.
शहापूर, मुरबाड, कल्याण, कर्जत, ठाण्यासह नाशिक तसेच नगर जिल्ह्यांत आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत सामाजिक हिताचे उपक्र म राबवत भक्तिमार्गाचा प्रसार करणाºया ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवाराचा महासत्संग मेळावा रविवारी श्रीक्षेत्र टाकेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. टाकीपठारचे सिद्धयोगी ब्रह्मलीन सद्गुरू ऋद्धिनाथबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आणि सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथजीबाबा यांचे विचार ऐकण्यासाठी सुमारे २० हजार भाविक मेळाव्यानिमित्ताने उपस्थित होते. यावेळी शहापूर तालुक्यातील सत्संग केंद्रे चांद्रीचापाडा, नांदवळ आणि मुरबाड तालुक्यातील कोलठण (ठाकरेनगर), शिंदीपाडा (बोरगाव) या उपक्रमशील केंद्रांना योगी रामनाथबाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
वनराई बंधारे बांधणाºया ११ सत्संग केंद्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गायक गंगाराम ढमके यांच्या भक्तिसंगीताने भाविकांची मने जिंकली. मानेखिंड गावातील तरुणांनी हजारो वाहनांसाठी केलेली नियोजनबद्ध पार्र्किं गव्यवस्था, काही भक्तांनी भाविकांसाठी केलेला शिरा, मिठाई, ताकवाटप तसेच पाण्याची सोय, ५०० स्वयंसेवकांनी केलेली भोजनव्यवस्था या सर्वांतून अनोख्या शिस्तीचे दर्शन उपस्थितांना घडले.
याप्रसंगी टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथबाबा, पीरजी योगी भगवती नाथबाबा, बालयोगी गोपीनाथबाबा, योगी अलखनाथबाबा आणि साधूसंतांसह पंढरपूरच्या मुमुक्षू पाठशाळेचे शास्त्री आदी उपस्थित होते.
नेत्यांचीही उपस्थिती
च्वेदान्ताचार्य मारु ती महाराज भांगरे, प्रमोद लांबे महाराज, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार पांडुरंग बरोरा,दौलत दरोडा, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, राजेश विशे, विकास गगे यांच्यासह सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.