एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:41 PM2018-10-19T18:41:06+5:302018-10-19T18:46:49+5:30
सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे : येथील पोखरणरोड नं. २वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील घरे तोडण्यासाठी शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. पात्र असलेल्या या रहिवाशांना एसआरएचे घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.
तोडण्यात आलेले घरे एसआरएच्या जागेवर आहे. त्यातील रहिवाशी एसआरए योजनेस पात्र आहे. त्या जागेवर एसआरएव्दारे इमारती बांधणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागा मोकळी होणे गरजेचे असल्यामुळे ही कारवाई झाली. मात्र त्या आधी या रहिवाशांची अन्यत्र निवास व्यवस्था करण्यात आली असून काही रहिवाशी ट्रॅस्टीट कॅम्पमध्ये तर काहींनी भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहे. यासाठी संबंधीत विकासकांने रहिवाशाना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची ही तरतूद आहे. मात्र रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती., त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशाना नोटीस काढून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
सुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहेत. येथील सर्व रहिवाशी या योजनेस पात्र आहेत. पण अविश्वास आणि मतभेद, वादविवादातून ते घरे सोडण्यास तयार नव्हते. त्यातील काहींच्या तक्रारीही होत्या. याकडे लक्ष केंद्रीत करून आजही कारवाई करण्यात आली. या भूखंडवरील काही घरे धोकादायक असल्याचे टीएमसीने आधीच घोषीत केलेले आहेत. येथील सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित आहे. त्यातील ११४ घरांना नोटीस काढून ही कारवाई केली. पण यापेक्षा जास्त घरांवरील कारवाईसाठी रहिवाशांनी प्रतिसाद दिल्यामुळे ते शक्य झाले. कोणीही विरोध दर्शवला नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. या कारवाईसाठी ११० जणांच्या मनुष्यबळासह १०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, काही बुल्डोझर आणि कर्मचाऱ्यांनी या घरांवर कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.