कृषी कायद्यांविरोधात हजारो कष्टकरी पायी प्रवास करीत मुंबईकडे रवाना, हजारो वाहने धडकणार राजभावनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 04:50 PM2021-01-24T16:50:32+5:302021-01-24T16:51:53+5:30
Farmer Protest : दिल्ली येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला.
कसारा - केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला. |
हा वाहन मार्च शनिवारी सायंकाळी सूमारे 20 हजार शेतकऱ्यांचा हा मार्च ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता रविवारी 20 हजार कष्टकरी सकाळी 8:30 वाजता घाट्नदेवी ते कसारा घाट मार्गे लतीफवाडी हे 12 किलोमीटर चे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाला . शेकडो वाहने घेऊन जाणाऱ्या सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी 12 किमी चा अवघड घाट पायी प्रवास करीत व केंद्र शासनाचा निषेध नोंदवत नाशिक मुंबई लेन वर दाखल होत पुढे कसारा पासून मुंबई राजभवाना कडे वाहन मार्च सुरु केला. या मोर्चा मद्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना राज्यभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यां सहभागी झालें आहेत. हा मार्च मुंबईकडे निघाला आहे.|
दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च रविवारी दुपारी मुंबईला दाखल होणार आहे.
दरम्यान सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा घेण्यात येणार असून त्या सभेत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते त्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस माजी खा. हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत. सभेनंतर येथे जमलेले हजारो शेतकरी दुपारी २ वाजता राजभवनाकडे कूच करणार आहेत व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. 1)शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, 2)शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, 3)वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, 4) वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे ,सुनील मालुसरे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले. विजय विशे .यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला दिली आहे.