उल्हासनगरात हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने हजारो जण रस्त्यावर, आमदार आयलानी यांचे आयोजन
By सदानंद नाईक | Published: November 27, 2022 02:58 PM2022-11-27T14:58:12+5:302022-11-27T14:58:40+5:30
Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील गोलमैदान येथे आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाला हजारो नागरिकांसह शालेय मुले, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योगा व कराटे शिक्षक-विध्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील गोलमैदान येथे आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाला हजारो नागरिकांसह शालेय मुले, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योगा व कराटे शिक्षक-विध्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला. आमदार आयलानी यांच्यासह आयुक्त अजीज शेख, माजी महापौर मीना आयलानी, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, सहायक आयुक्त अजित गोवारी, रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगर गोलमैदान परिसरात आमदार कुमार आयलानी यांनी हॅपी स्ट्रीटचे आयोजन रविवारी सकाळी साडे सहा ते १० वाजण्या दरम्यान केले होते. हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध सामजिक संस्था, योगा केंद्र, विविध शाळेचे विद्यार्थी आणि नागरिकानी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला .यामध्ये प्रामुख्याने आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वामी विवेकानंद स्कूल, सोहम फाउंडेशन, श्री चैतन्य, सेंचूरी स्कूल, स्वस्थ भारत योगा केंद्र, साधुबेला स्कूल, अंबिका योग कुटीर, जुडो आर्ट्स, स्वामी विवेकानंद योगा केंद्र. बाल्कनजी बारी स्कूल, स्वामी शांती प्रकाश योगा केंद्र, सिंधू सखा संगम, मिड टाऊन डान्स अकेदेमी, भाजप आर्ट्स अँड कल्चर, ओम योगा, सिटिझन क्लब, पेट ऑक्सफर्ड स्कूल,दिविने योगा, संभू डान्स, फॅमिली कृष्णा सुर संगीत, नुपूर डान्स अकेदेमी, झुलेलाल स्कूल, एसवायसी सिंधी संगीत, जॅक्सन डान्स अकेदामी, एनसीटी स्कूल, सिंधू युथ सर्कल, पतंजली योग, सिंधू एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब ऑफ सिंधूनगर आदीनी सहभाग घेतला. गोलमैदान येथील हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन आनंद साजरा केला.
या कार्यक्रमा मध्ये आमदार कुमार आयलानी, सिंधी संत भाऊ लीलाराम, मधुसूदन बापू, पुष्पा दीदी, माजी महापौर मीना आयलानी, महेश सुखरमानी, डॉ प्रकाश नाथांनी, लाल पंजाबी, मनोज साधनानी, जवाहर धामेजा, मंगला चांडा, उमेश सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. वाहतूक पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून वाहतूक कोंडी होऊ दिली नाही. तर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.