आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरली 'स्त्री संतांची मांदियाळी' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:27 PM2019-07-15T15:27:15+5:302019-07-15T15:37:21+5:30

आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'स्त्री संतांची मांदियाळी' अवतरली होती. 

Thousands of 'saints' in 'Thane' | आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरली 'स्त्री संतांची मांदियाळी' 

आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरली 'स्त्री संतांची मांदियाळी' 

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर अवतरली 'स्त्री संतांची मांदियाळी' कलाकारांच्या पंढरीत जणू अवतरला कानडा राजा पंढरीचाअभिनय कट्ट्यावरील संपूर्ण वातावरण विठ्ठलमय

ठाणेअभिनय कट्टयावर अवतरले अवघे पंढरपूर येधील प्रत्येक कलाकार प्रत्येक रसिक प्रेक्षक वारकरी जाहले आणि कलाकारांच्या पंढरीत जणू अवतरला कानडा राजा पंढरीचा. अभिनय कट्ट्यावरील संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते आणि ह्या पवित्र भक्तिमय वातावरणात अवतरली आपल्या कर्तृत्वाने आपल्या भक्तीने आयुष्य विठ्ठलमय जगलेल्या स्त्री संतांची मांदियाळी.

         अंकुर ग्रुप ठाणे प्रस्तुत 'स्त्री संतांची मांदियाळी' म्हणजे तुकाराम ज्ञानेश्वर , नामदेव आशा काही पुरुष संतांच्या अस्तित्वात हरवलेल्या पण वारकरी संप्रदायात स्वतःची वेगळी ओळख असलेल्या आणि विठ्ठलभक्तीने समाजात स्वतःच आगळंवेगळ अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्री संतांची जिवनकहानी जणू.  ज्ञानदेव निवृत्ती सोपानदेवांची भगिनी आणि कमी वयात विठ्ठलभक्ती अन आयुष्यच आगळ तत्वज्ञान आपल्या कर्तृत्वाने समाजासमोर मांडणारी 'संत मुक्ताई', सामान्य घरात जन्म असलेली तरी सौन्दर्यावती नृत्यांगना पण आपल्या विठ्ठलभक्तीने विठ्ठलचरणी स्थान मिळवणारी 'संत कान्होपात्रा',  नास्तिक सासर तरी आपक्या विठ्ठल भक्तीने स्वतःचे आयुष्य विठ्ठलमय करणारी 'संत सखुबाई', 'दळीता कांडीता तुझं गायिन अनंता' म्हणणारी 'नामयाची दासी'  विठ्ठलभक्ती ओव्याची रचनाकार 'संत जनाबाई', संत चोखामेळ्याची  बायको 'अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।' म्हणत सामाजिक रुढींवर भाष्य करणारी 'संत सोयराबाई', संत तुकारामाची शिष्या सवर्ण घरातील तरी आयुष्य विठ्ठलमय जगणारी 'संत बहिणाई' या साऱ्याजनी घेऊनि पालखी विठ्ठलाची अभिनय कट्ट्यावर अवतरल्या आणि अभिनय कट्ट्यावर टाळ मृदंगाच्या गजरात खेळ मांडीयेला वाळवंटीकाठी ह्या गीतांचे भक्तिमय सादरीकरण केले. प्रसन्न झालेल्या विठ्ठलाने  खऱ्या भक्तीचा अर्थ सांगितला..हे सारे भक्त होते म्हणून मी देवरूप जाहलो.वारीचा उत्साह मन प्रसन्न करतो पण वारी नंतरचे अस्वच्छ पंढरपूर आणि प्रदूषित चंद्रभागा त्रास देऊन जाते.याचा विचार व्हावा असे आवाहन पंढरीचा राजाने साऱ्या वारकऱ्यांना केले. सदर कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन अलका वढावकार यांनी केले होते. नीलिमा चित्रे,गीता सुळे, शुभा प्रधान,विनिता देशमुख,विनिता सोनाळकर,ज्योती गुप्ते,सुचिता चिटणीस,रश्मी चित्रे,रुपाली प्रधान आणि अलका वढावकार ह्यांनी सादर कार्यक्रमात भाग घेतला. सदर कार्यक्रमाचे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

         आज 'स्त्री संतांची मांदियाळी' ह्या कार्यक्रमामुळे जणू पंढरपूर अभिनय कट्ट्यावर अवतरले.आपला इतिहास हा पुढच्या पिढीला सांगायचं काम जुन्या जाणत्या लोकांचं कर्तव्य आहे तरच आपली संस्कृती टिकून राहील.आजच्या युगातील स्त्रीयांनी संत परंपरेतील कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या कलाकृतीतून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

Web Title: Thousands of 'saints' in 'Thane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.