मुंब्रा परिसरातील अनधिकृत शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 08:31 PM2019-05-09T20:31:14+5:302019-05-09T20:38:44+5:30
मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाची मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजाविल्या होत्या.
ठाणे : अनधिकृत शाळा बंद पडण्याची टांगती तलवार आहे. मुंब्रा परिसरात या अनधिकृत शाळांचे पेव फूटले आहेत. त्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडल्यामुळे पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. याची दखल घेऊन मुंब्रा शहरातील हजारो गरीब विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेकडे पारठपुरावा केला. त्यास अनुसरून महापालिकाआयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांच्या समायोनाचे निर्देश जारी केले आहेत.
मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाची मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजाविल्या होत्या. या नोटीसमुळे शाळा बंद होताच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनासह महापालिकेकडे सतत पाठ पुरावा केला असता त्यात यश मिळाले आणि महापालिकेने या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय जारी केल्याचे डावखरे यांनी सांगितले.
ठाणे महापालिका आयुक्तांची सोमवारी भेट घेऊन तसेच बंद पडणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या प्रत्यक्ष निदर्शनात आणून देताच त्यांनी या विद्यार्थ्यांचे लवकर अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे सांगून निर्णय ही जारी केला आहे. एकाही मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीकोनातून त्यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांना या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश जारी केले. या विद्यार्थ्यांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिल्याचे डावखरे यांनी निदर्शनात आणून दिले. या निर्णयामुळे मुंब्रा परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना या समायोजनेचा धिलासा मिळाला आहे.