जमिनी सोडण्यासाठी धमक्या :शेतकऱ्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:42 AM2017-08-10T05:42:05+5:302017-08-10T05:42:05+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत.
शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत. परंतु या शेतकºयांना काही सावकार जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी धमकावत असल्याने शेतकºयांनी आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर येथील काही अधिकाºयांवर विविध आरोप होत असल्याच्या आशयाचे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी घेतलेली ही भेट विशेष अधोरेखित करणारी ठरत आहे. मंगळवारी दुपारी आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेच्या ४० हून अधिक शेतकरी महिला व पुरु षांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी निवेदन दिले.
काही सावकार मंडळी शेतकºयांच्या जमिनीवर आपला हक्क सांगत असून अनेक पिढ्यांपासून या जमिनीवर कष्ट करणाºया शेतकºयांचा हक्क हिसकावून घेत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या ठरावानुसार या जमिनीवर शेतकºयांचा वडीलोेपार्जित हक्क आहे, असा ठराव केला आहे. येथील सावकारांचे असे म्हणणे आहे की ‘‘१०० टक्के जमिनीचा मोबदला शेतकºयांना न देता आम्हाला मिळायला हवा कारण ही जमीन आमच्या नावावर आहे’. तर शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही ५० ते ६० वर्षापासून येथील जमिनीवर काबाड कष्ट करत आहोत.
अन्याय करणाºयांवर गुन्हा दाखल करा
जिल्हाधिकाºयांनी पेसा अंतर्गत कूळकायद्याची योग्य कारवाई करून शेतकºयांवर अन्याय करणाºयांवर आदिवासी कायद्याानुसार गुन्हा दाखल करावा, अशी विनंती आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तळपाडे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर यावेळी मौजे वाशाळा बुद्रुक, येथील शेतकºयांनी स्वाक्षरी करु न जमीन संपादनला दिलेली संमतीचे कागदपत्रही जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केली.