देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर
By जितेंद्र कालेकर | Published: October 2, 2022 09:41 PM2022-10-02T21:41:34+5:302022-10-02T21:44:12+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत.
ठाणे: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर देशविरोधी प्रवृत्ती ठेचून काढण्याचे काम सुरु आहे. त्याने भयभीत होऊनच मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी ठाण्यात केला.
ठाणे शहरातील दानशूर व्यक्तींकडून ४०० क्षय रुग्णांना सलग सहा महिने दरमहा पोषक आहार दिला जाणार आहे. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाद्वारे ठाणे शहरातून क्षय रोगाचे निर्मूलन करण्यासाठी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला. निक्षय मित्र योजनेंतर्गत ठाण्यातील दानशूर व्यक्तींनी पहिल्या टप्यात ४०० रुग्णांना पोषक आहार देण्याचे ठरविले. या कार्यक्रमाचे ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना दरेकर यांनी हा आरोप केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. ते या सर्व गोष्टी शोधून काढतील. या प्रकारणाचा पूर्ण पदार्पाश करून फडणवीस ते मुळासकट ठेचून काढतील, असेही दरेकर म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत चला विचारांचं सोनं लुटूया, अशी घोषणा दिली जायची.आता अशी घोषणा दिली जाते का?असा सवाल ही दरेकर यांनी दसरा मेळाव्याबद्दलच्या प्रश्ना उत्त्तर देतांना उपस्थितीत केला. आता उद्धव ठाकरे यांचा विचार हा सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा विचार झाला आहे. त्यांचा विचार हिंदुत्ववादी विरोधी झाल्याची टिकाही त्यांनी केली. वारसा हा विचारांचा असतो. केवळ जन्माला आलं म्हणजे वारसा येतं नसतो. तो विचारांचा वारसा एकनाथ शिंदे यांना शिवसेनिकांनी आणि जनतेने दिला. परिणामी हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं हें बीकेसीला लुटलं जाईल.तो हिंदुत्ववादी मेळावा असेल.तर शिवाजी पार्क येथे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संयुक्त मेळावा असेल असं दरेकर म्हणाले.