ठाण्यात जावयाने केली सासूला मारहाण, मेहुणीलाही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:35 AM2020-03-06T01:35:52+5:302020-03-06T01:35:57+5:30

मेहुणीला ठार मारण्याची धमकी देऊन घरात शिरलेल्या हर्ष केणी या जावयाने सासू ज्योती लडकत (४९, गोखले रोड, नौपाडा, ठाणे) यांना जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली.

Threatened to go to Thane, beat her mother-in-law and threaten her sister-in-law | ठाण्यात जावयाने केली सासूला मारहाण, मेहुणीलाही दिली धमकी

ठाण्यात जावयाने केली सासूला मारहाण, मेहुणीलाही दिली धमकी

Next

ठाणे : मेहुणीला ठार मारण्याची धमकी देऊन घरात शिरलेल्या हर्ष केणी या जावयाने सासू ज्योती लडकत (४९, गोखले रोड, नौपाडा, ठाणे) यांना जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जावई केणी याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गोखले रोड येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या पतीचे २००७ मध्ये निधन झाले आहे. त्यांच्या पूनम आणि सोनम या दोन मुलींचा विवाह झाला आहे. तर, प्रियल ही तिसरी मुलगी त्यांच्यासमवेत असते. सोनम हिचा हर्ष केणी याच्यासमवेत २००७ मध्ये प्रेमविवाह झाला आहे. मुलगी सोनम हिच्याशी वारंवार भांडणे करून तिला ते त्रास देत असल्याने जावई आणि सासू ज्योती यांचेही एकमेकांशी पटत नव्हते. याच कारणामुळे ते आपल्या सासूरवाडीलाही जात नव्हते.
१९ फेब्रुवारी २०२० रोजी हर्ष याने मेहुणी प्रियल हिला फोनवरून पत्नी सोनमबाबतची विचारपूस केली. मात्र, सोनमच्या वैयक्तिक बाबींबाबत तिच्याकडेच विचारपूस करावी, असा सल्ला प्रियलने त्याला दिला. याचाच राग आल्याने तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ करून त्याने फोन बंद केला. त्यानंतर, ३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ज्योती लडकत या एकट्याच घरी असताना हर्षने त्यांचे नौपाड्यातील घर गाठले. वारंवार दरवाजा वाजवूनही लवकर दरवाजा उघडला न गेल्याने हर्ष याने दरवाजावर लाथा मारल्या. अखेर, ज्योती यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्याने घरात शिरकाव करून मेहुणी प्रियल हिची विचारपूस करून तिचा शोध घेतला. त्याने दोघींनाही शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ न करण्याबाबत सासूने त्याला सुनावल्यानंतर त्याने रागाच्या भरात ज्योती यांना मारहाण करून त्यांना ढकलून दिले. तुम्हाला दोघींना सोडणार नाही, ठार मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला.
>चौकशी सुरु
ज्योती लडकत यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ५ मार्च रोजी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लडकत यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून, यासंदर्भात आरोपींचा जबाब नोंदवणार असल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Threatened to go to Thane, beat her mother-in-law and threaten her sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.