पैशांच्या आमिषाने महिलांना शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवले : तिघींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 08:29 PM2019-02-10T20:29:26+5:302019-02-10T20:46:21+5:30

ठाण्याच्या उपवन परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या शंकर सोनार या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने रविवारी पहाटे अटक केली.

Three accused arrested in sex racket by tempting of money : Three women released | पैशांच्या आमिषाने महिलांना शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवले : तिघींची सुटका

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईउपवन भागातील प्रकार निवासी इमारतीमध्ये सुरु होता कुंटणखाना

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून गरीब, गरजू तरुणींना शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवण-या शंकर रामसिंग सोनार (४१) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास उपवन येथून अटक केली. त्याच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपवन येथील कृष्णा टॉवर, मिसाळवाडी भागात एक व्यक्ती गरीब तरु णींना आणि महिलांना पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्रयाचा व्यवसाय करण्यास भाग पाडतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्याआधारे दौंडकर तसेच उपनिरीक्षक रंजना बनसोडे यांच्या पथकाने ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ५.३५ वाजण्याच्या सुमारास कृष्णा टॉवरमध्ये या निवासी इमारतीमध्ये छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये शंकर या दलालास अटक करून त्याच्या ताब्यातून तीन पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसिंग याने आणखी किती महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला पोलीस उपनिरीक्षक पी.बी. यादव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Three accused arrested in sex racket by tempting of money : Three women released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.