प्रशासकीय दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे वेतन रखडलेले जि.प.चे साडेतीन हजार शिक्षक आर्थिक विवंचनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:49 PM2021-06-04T15:49:17+5:302021-06-04T15:49:57+5:30
teacher News: तनासाठी एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनासाठी वेतन आर्थिक तरतूद प्राप्त झाली असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाई व निष्काळजीमुळे वेतन रखडले असल्याचा आरोप शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
ठाणे - येथील जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रामीण, दुर्गम भागातील एक हजार 328 प्राथमिक शाळांचे तब्बल तीन हजार 737 शिक्षक, मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक आणि केंद्र प्रमुख आदींचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले असून प्रशासनाच्या मनमानी विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.
या वेतनासाठी एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनासाठी वेतन आर्थिक तरतूद प्राप्त झाली असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाई व निष्काळजीमुळे वेतन रखडले असल्याचा आरोप शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या वेतन समस्येची गंभीरबाब पदाधिकारी व अधिका:यांच्या निदर्शनात आणून दिलेली असतानाही त्यांवर अद्यापही गांभीर्याने विचार केला जात नसल्यामुळे प्राथमिक शिक्षकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याविरोधात शिक्षक संघटना एकत्र येऊन प्रशासनाच्या मनमानी व निष्काळी विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.
शिक्षकांनी या आधी वेळोवेळी आंदोलने करून प्रत्येक एक तारखेला वेतन देण्याची मागणी शासनाकडून मंजूर करून शासन निर्णयही जारी करून घेतले आहेत. त्यात उशिरा वेतन झाल्यास संबंधित अधिका:यांना जबाबदार धरून कडक कारवाई करण्याचे आदेश असतानाही आदेशाची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या या मनमानी व दुर्लक्षितपणामुळे गेल्या मार्च महिन्याचे वेतन मे महिन्यात अदा करण्यात आले. तर आताही एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनास दिरंगाई झाल्यामुळे शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
दर एक तारखेस मिळणारे वेतन तब्बल दोन, दोन महिने विलंबाने होत असल्याने या शिक्षकांचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे. या अनेक शिक्षकांचे गृह व इतर कर्जाचे हप्ते थकले आहेत. अधिक व्याजाचा भरूदड जिल्ह्यातील या शेकडो शिक्षकांना बसत आहे. त्यात काहींचे कुटूंब कोरोनाच्या चक्रव्युहात सापडले आहे. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यात या आर्थिक समस्येमुळे वैद्यकीय उपचाराच्या बिलांची रक्कम वाढल्यामुळे या गंभीर आजारपणात प्रशासनाच्या निष्काळजीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व ग्रामस्थांनी लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आदी कामांसाठी शिक्षक आरोग्य विभागाच्या संगतीला सध्या सक्रीय आहे. एप्रिल, मे महिन्यांची सुटी या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ‘मिशन मोड अंतर्गत कामासाठी खर्ची घातली आहे. त्यासाठीही त्यांना ना विमा संरक्षण, ना प्रतिबंधात्मक साधनांची उपलब्धता तरीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. कोरोना लस विरोधातील गैरसमज दूर करीत आहेत. बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आदी सर्व कामे शिक्षक करीत असतानाही वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून ऐकायला मिळत आहे.
शिक्षकांचे वेतन रखडले, हे खरे आहे. पण शिक्षकांच्या या वेतनासाठीआर्थिक तरतूद नसल्यामुळे ते वेळेवर होऊ शकले नाही. पण आता तरतूद आली आहे. ट्रेझरीत बील टाकले आहे. सोमवारी किंवा मंगळवारी शिक्षकांचे वेतन नक्की होईल.
- सुभाष पवार
उपाध्यक्ष- जि.प. ठाणो