‘एमडीएमए’सह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या त्रिकुटास ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:50 PM2020-12-14T23:50:51+5:302020-12-14T23:53:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मिथिलीन डायआॅक्सी मेथा फिटामाईन अर्थात ‘एमडीएमए’ सह अमली पदार्थांची तस्करी करणाºया अयुब अन्सारी (२१, ...

Three arrested for drug trafficking with MDMA | ‘एमडीएमए’सह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या त्रिकुटास ठाण्यातून अटक

सात लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई सात लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मिथिलीन डायआॅक्सी मेथा फिटामाईन अर्थात ‘एमडीएमए’ सह अमली पदार्थांची तस्करी करणाºया अयुब अन्सारी (२१, रा. भिवंडी, ठाणे) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ७८ हजार ८१० रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत केला आहे.
कोपरीतील आनंदनगर येथील बंद जकात नाक्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर एक व्यक्ती अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. तिच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रशांत पवार, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, शरद तावडे, देविदास जाधव, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, राजेंद्र गायकवाड, अजय फराटे, दिलीप शिंदे, शिवाजी रायसिंग, शशीकांत नागपुरे, विजयकुमार गोºहे, राजेश क्षत्रीय, मनोज पवार, अजित शिंदे, सागर सुरळकर, महिला पोलीस नाईक कल्पना तावरे, सुजाता शेलार आणि चालक यश यादव आदींच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील मुंंबई ते ठाण्याच्या दिशेने येणाºया रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी अयुब अन्सारी याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये दोन लाख २० हजारांची ५५ ग्रॅम वजनाची मेफे ड्रॉन (एमडी) पावडर, मोबाईल आणि काही रोकड असा दोन लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्याच्याच चौकशीतून हुसेन राजानी (३२, रा. अंधेरी) आणि नबी शेख (३०, रा. चेंबूर) या अन्य त्याच्या दोन साथीदारांना १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एमडीएमए, एसकेटॅसी पिल्स, एलएसडी डॉट, गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या टोळीकडून एकूण सात लाख ७८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
* एकाचवेळी विविध प्रकारचे अमली पदार्थ एकाच टोळीकडून मिळण्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या तिघांनाही १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Three arrested for drug trafficking with MDMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.