उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानाच्या चोरीतील तिघांना अटक

By सदानंद नाईक | Published: August 22, 2023 08:14 PM2023-08-22T20:14:24+5:302023-08-22T20:14:33+5:30

उल्हासनगर पुलिस व ठाणे क्राइम ब्रांचच्या पथकाने संयुक्तपणे चोरीचा तपास केला असून सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक उपकरणाचा उपयोग तपास वेळी केला

Three arrested in theft of Vijayalakshmi jewelers shop in Ulhasnagar | उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानाच्या चोरीतील तिघांना अटक

उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानाच्या चोरीतील तिघांना अटक

googlenewsNext

 उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौकातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात २७ जून रोजी मध्यरात्री वॉचमनसह इतरांनी तब्बल ६ किलो सोन्याची दागिने लंपास केले. याप्रकरणी तब्बल दिड महिन्यांनंतर ३ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून ५५ लाखाचे दागिने हस्तगत केले आहे.

 उल्हासनगरातील शिरू चौक परिसरात विजयालक्ष्मी नावाचे सोन्याचे दुकान आहे. २७ जून रोजी सोन्याच्या दुकानाच्या वॉचमनने पत्नीसह सहकार्याच्या मदतीने सोन्याच्या दुकानात खिडकीद्वारे प्रवेश करून गॅस कटर्सने लोखंडी तिजोरी फोडून त्यातील ३ कोटी किमतीचे ६ किलो सोने चोरून पोबारा केला. चोरी प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने गेले दिड महिन्यापासून पोलीस तपास करीत होते. अखेर पोलिसांना यश येऊन माधव चुनलाला गिरी, दिनेश उर्फ सागर रावल व दिपक रामसिंग भंडारी या तिघांना अटक करून त्यांच्याकडून ५५ लाख किनातीचे ५५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तर टोळीतील ७ जण अध्यापही फरार असून लवकरच त्यांना जेरबंद करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. 

उल्हासनगर पुलिस व ठाणे क्राइम ब्रांचच्या पथकाने संयुक्तपणे चोरीचा तपास केला असून सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक उपकरणाचा उपयोग तपास वेळी केला. अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दिनेश उर्फ सागर रावल हा अट्टल चोर असून त्याच्यावर मध्यप्रदेश, गुजरात, बंगलोर व राज्यातील पनवेलसह इतर ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही घरफोडीची टोळी सक्रिय असून चोरी करण्यापूर्वी त्याठिकाणचे सर्वेक्षण टोळीतील सदस्यांकडून होते. त्यानंतर चोरी केली जाते. विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानातील चोरी प्रकरणी पोलीस पथके लखनऊ, बनारस, नेपाळ, बॉर्डर परिसरात तपास केला असून फरार असलेल्या ७ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Three arrested in theft of Vijayalakshmi jewelers shop in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.