ठाण्यातील वागळे इस्टेट येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरटयांसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 06:25 PM2020-11-22T18:25:21+5:302020-11-22T18:28:24+5:30
कंपनीतून पाच माइल्ड स्टीलच्या प्लेटा चोरणाºया कैलास चुडासमा (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि विलास वाघमारे (३३, रा. वागळे इस्टेट) या चोरटयांसह चोरीचा माल विकत घेणारा आलमगीर शेख (२५, रा. वागळे इस्टेट) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून ३० किलो वजनाच्या दोन माईल्ड स्टील प्लेटा हस्तगत केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट, जय भवानी नगरातील इलेक्ट्रो फॅब, हॉइस्ट अॅन्ड कॅन्सस मॅन्युफ्रॅक्चर कंपनीतून पाच माइल्ड स्टीलच्या प्लेटा चोरणाºया कैलास चुडासमा (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि विलास वाघमारे (३३, रा. वागळे इस्टेट) या चोरटयांसह चोरीचा माल विकत घेणारा आलमगीर शेख (२५, रा. वागळे इस्टेट) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट, श्रीनगर येथे राहणारे सिरील डिसूझा (५६) यांच्या मालकीच्या इलेक्ट्रो फॅब, हॉइस्ट अॅन्ड कॅन्सस मॅन्युफ्रॅक्चर कंपनीतून १९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला. त्यांनी फॅब्रिकेशन शॉपमध्ये मशिनिंग करुन ठेवलेल्या सुमारे ११० किलो वजनाच्या पाच माइल्ड स्टील प्लेटांची चोरी केली होती. हे दोघेही चोरटे वागळे इस्टेट परिसरातील असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निकुंभ यांच्यासह जमादार ए. टी. पवार, पोलीस नाईक एस. ए. मोरे, टी. एम. खोत, एस. बी. थोरात, आर. व्ही. जाधव, आर. सी. शेलार आणि डी. पी. बरले आदींच्या पथकाने कैलास आणि विलास या दोघांना १९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वागळे इस्टेट येथील त्यांच्या घरातून अटक केली. तर चोरीचा माल खरेदी करणारा आलमगीर या भंगार विक्रेत्यालाही २० नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून ३० किलो वजनाच्या दोन माईल्ड स्टील प्लेटा हस्तगत केल्या आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तसेच चोरीचा माल हस्तगत करणे बाकी असल्यामुळे तिघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी वागळे इस्टेट पोलिसांनी केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.