दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: July 10, 2017 11:35 PM2017-07-10T23:35:56+5:302017-07-10T23:40:02+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी -१ च्या पथकाने गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकासह
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 10 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी -१ च्या पथकाने गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकासह तीन वेगवेगळया ठिकाणी केलेल्या कारवाईत ३२७ लीटर गावठी दारूसह ९८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या आदेशाने ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक देशमुख आणि गायकवाड आदींच्या पथकाने अंबरनाथमधील मणेरागावातून १० जुलै रोजी सकाळी गावठी दारूची वाहतूक करणारी शिरसाठ याची रिक्षा पकडली. शिरसाठ याच्याकडून १५५ लीटर गावठी दारूसह ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य एका गुन्ह्यात १७२ लीटरच्या गावठी दारूसह ५० हजारांचा ऐवज या पथकाने पकडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी, श्रीनगर आणि कापूरबावडी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रिक्षासह दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून १५५ लीटर गावठी दारूसह ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या आदेशाने ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक देशमुख आणि गायकवाड आदींच्या पथकाने अंबरनाथमधील मणेरागावातून १० जुलै रोजी सकाळी गावठी दारूची वाहतूक करणारी ही रिक्षा पकडली. अन्य एका गुन्ह्यात १७२ लीटरची गावठी दारूसह ५० हजारांचा ऐवज या पथकाने पकडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी, श्रीनगर आणि कापूरबावडी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दि