ठाण्यातील पेट्रोल पंपावर जबरी चोरी करुन पळणारे त्रिकुट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 06:28 PM2020-12-11T18:28:35+5:302020-12-11T18:45:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील तत्वज्ञान विज्ञापीठ परिसरातील एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करुन ३५ हजारांची रोकड हिसकावून ...

Three arrested for robbery at petrol pump in Thane | ठाण्यातील पेट्रोल पंपावर जबरी चोरी करुन पळणारे त्रिकुट जेरबंद

चितळसर पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्दे चितळसर पोलिसांची कामगिरी लुटीतील ३२ हजारांची रोकड हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील तत्वज्ञान विज्ञापीठ परिसरातील एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करुन ३५ हजारांची रोकड हिसकावून पलायन करणाºया प्रकाश अंगारी (२०), सुनिल पाटीदार (२५) आणि मोहन डेडोर (३०) या तिघांना चितळसर पोलिसांनी गुरुवारी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.
तत्वज्ञान विज्ञापीठ सेवा रस्त्यावरील कैलास पेट्रोल पंप येथे १० डिसेंबर रोजी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास शिवशांत उपाध्याय (२५) हे कर्मचारी पंपावरील एका कॅबिनमध्ये पैसे मोजत होते. त्यावेळी प्रकाश अंगारी याने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत कॅबिनमध्ये शिरकाव केला. त्यानंतर लगेच आरोपी सुनिल याने शिवशांत यांच्याकडे येऊन ‘तेरे पास पैसा कितना है’, असे बोलून त्यांच्या छातीच्या उजव्या भागावर जोरदार प्रहार करुन त्यांना खाली पाडले. नंतर त्यांच्या हातातील रोकड खेचून पलायन केले. त्याचवेळी टेहळणीसाठी बाहेर उभा असलेला त्यांचा तिसरा साथीदार मोहन यानेही तिथे असलेली रोकड घेऊन पलायन केले. पेट्रोलपंपासमोर आरडाओरडा सुरु असल्याची माहिती गस्तीवरील शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शशीकांत रोकडे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे गस्ती पथकातील जमादार प्रदीप पाटील आणि हिराजी सुतार तसेच पोलीस नाईक चालक किशोर साळुंखे यांनी तत्वज्ञान विज्ञापिठाजवळील फ्लायओव्हर हाईड पार्कच्या दिशेने पळालेल्या प्रकाश अंगारी याच्यासह तिघांनाही अर्ध्या तासांच्या धुमश्चक्रीनंतर ताब्यात घेतले. १० डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या ेसुमारास या तिघांनाही चितळसर पोलिसांनी अटक केली.
 

Web Title: Three arrested for robbery at petrol pump in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.