समाजमाध्यमांतून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:52+5:302021-06-17T04:27:52+5:30
मीरा रोड : समाज माध्यमांवर जाहिराती देऊन, तसेच व्हॉट्सॲपवर तरुणींची छायाचित्रे पाठवून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तिघांना मीरा रोड येथून पोलिसांनी ...
मीरा रोड : समाज माध्यमांवर जाहिराती देऊन, तसेच व्हॉट्सॲपवर तरुणींची छायाचित्रे पाठवून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तिघांना मीरा रोड येथून पोलिसांनी अटक केली आहे. दोन पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली होती की, एस्कॉर्ट सर्व्हिसच्या ऑनलाइन समाज माध्यमांवर जाहिराती देऊन वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविल्या जात आहेत. ग्राहकांना व्हॉट्सॲपवर तरुणींची छायाचित्रे पाठवून लॉजमध्ये रूम बुकिंगपासूनची सोय वेश्या व्यवसाय चालवणारे करत आहेत. त्यानुसार, मंगळवारी पाटील यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून जीसीसी क्लबमागील आकृती इमारत क्रमांक १३ जवळ पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे रिक्षा चालक चंद्रशेखर यादव (४८) रा. मिथिल हाइट्सजवळ, मीरा रोड हा एका तरुणीस वेश्या व्यवसायासाठी घेऊन आला होता. त्यावेळी पैसे स्वीकारताच पोलिसांनी त्याला पकडले. यादवच्या चौकशीनंतर वेश्या व्यवसाय चालविणारा मुख्य दलाल सुरज कुमार उर्फ आशिष राणा आणि त्याचा साथीदार राजा यादव यांना दीपक हॉस्पिटलच्या गल्लीतून अटक करण्यात आली.