मीरा-भाईंदरमधून तीन कोटींचे मॉर्फिन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:10 AM2019-05-26T04:10:04+5:302019-05-26T04:10:15+5:30
ठाणे, मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेल्या तीन कोटी रुपयांच्या ७४ किलो मॉर्फिन या अमली पदार्थाचा साठा ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमधून जप्त केला आहे.
मीरा रोड : मध्य प्रदेशहून ठाणे, मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेल्या तीन कोटी रुपयांच्या ७४ किलो मॉर्फिन या अमली पदार्थाचा साठा ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमधून जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश व राजस्थानचे आहेत.
कुलकर्णी यांना भार्इंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ अमली पदार्थविक्रीसाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता. ईश्वर उमराव सिंग हा सुमारे तीन किलो मॉर्फिन हे अमलीपदार्थ घेऊन आला असता पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वरकडे केलेल्या चौकशीनंतर त्याचे आणखी तीन साथीदार अमली पदार्थांच्या साठ्यासह थांबल्याचे समजले. पोलिसांनी गाडीतून जवळपास ७१ किलो मॉर्फिनचा साठा सापडला. ईश्वरसह राहुल मीना (२१), शंभू सोलंकी (२१) व मुकेशकुमार ढोली (३०) अशी आरोपींची नावे आहेत. दोन कोटी ९६ लाख रुपये जप्त मॉर्फि नची किंमत असून तीन लाखांची गाडी आहे. भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.