बोर्डीत तीनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन
By admin | Published: December 9, 2015 12:33 AM2015-12-09T00:33:13+5:302015-12-09T00:33:13+5:30
महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे २२ वे राष्ट्रीय अधिवेशन ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बोर्डीत संपन्न झाले
बोर्डी : महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे २२ वे राष्ट्रीय अधिवेशन ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बोर्डीत संपन्न झाले. ‘शिक्षक, शिक्षण व प्रशिक्षण’, ‘नवीन उपक्रम व बदलते प्रवाह’ या विषयांवर माजी कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ऊहापोह केला. या अधिवेशनाचे संयुक्त आयोजन बोर्डीतील ना. गोपाळ कृष्ण गोखले सभागृहात झाले. खासदार अॅड. चिंतामण वनगा प्रमुख पाहुणे तर गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम.एस. गोसावी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अॅड. वनगा यांच्या हस्ते एज्युकेशन ग्रंथाचे, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.के. काळे स्वयंप्रेरणा अंक, तर परिवर्तन मुखपत्राचे अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.टी. देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन झाले. परिषदेतर्फे १५ वा नामदार गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कार डॉ. एस.टी. देशमुख यांना प्रदान करण्यात
आला. डॉ. एम.ए. गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणातून गुरुशिष्य परंपरेचे योगदान, तर अॅड. चिंतामण वनगा यांनी डिजिटल इंडिया, स्कील डेव्हलपमेंट इ. विषयांचा परामर्श घेतला. प्रा. बी. देवराज यांनी आभारप्रदर्शन केले. देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शन व अनुभवाचा लाभ झाला. (वार्ताहर)