तीन दिवसांनी मध्यरेल्वे रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:47 PM2019-08-05T21:47:32+5:302019-08-05T21:48:07+5:30
चाकरमान्यांची तोबा गर्दी : कोपर, मुंब्रा स्थानकात बाधितांचे ठाण
डोंबिवली: मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून रखडत धावणारी मध्यरेल्वे सोमवारी दुपारपासून काहीशी रुळावर आली. सकाळच्या पहिल्या सत्रमध्ये कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा सुरु होती. त्यातही जलद मार्गावरची वाहतूक बराच वेळ बंद होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमधील धिम्या मार्गावरील फलाट क्रमांक 1,2 आणि 3 या ठिकाणी प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठांचे हाल झाले.
सोमवारी सकाळी 8.3क् नंतर धिम्या मार्गावरची वाहतूक पंधरा मिनिटांसाठी दुतर्फा खोळंबली होती. बदलापूर, टिटवाळा आसनगाव येथून सकाळी 9 र्पयत लोकल वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे तेथील प्रवाशांचे सोमवारीही हाल झाले. कल्याण -डोंबिवली परिवहनने दोन बसफे:या सोडल्याने बदलापूर ते कल्याण मार्गावर शेकडो प्रवाशांची सोय झाल्याची माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली. सकाळी बदलापूर, अंबरनाथ रेल्वे मार्गदेखील सुस्थितीत असल्याचा हिरवा कंदिल रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून मिळाल्यावर सकाळी 1क् वाजून 17 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने या मार्गावर पहिली लोकल धावली. त्यादरम्यान टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी स्थानकांमधूनही टप्प्याटप्प्याने लोकल सेवा सुरु झाली. बदलापूर ते कर्जत हा मार्ग सोमवारी संध्याकाळीही बंदच होता. दिवा, मुंब्रा मार्गावर रेल्वे रुळानजीक पाणी भरल्याने तेथे वाहतुकीचा वेग मंदावला होता. सोमवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या. त्यामुळे कुठेही पाणी तुंबले नाही. दुपारनंतर लोकल वाहतूक सुरळीत झाली होती. जलद मार्गावरील वाहतुकीलाही सुरुवात झाली होती. अडीच वाजल्यानंतर साधारणपणो पंधरा मिनिटे विलंबाने लोकल धावल्या.
कोपर रेल्वे स्थानकानजीक पूर्वेकडील चाळींमध्ये खाडीचे पाणी गेल्याने काहींनी रविवारची रात्र कोपर स्थानकात, तसेच पादचारी पुलावरच काढली. सोमवारीही काही बाधित फलाटातच पथारी मांडून बसले होते. मुंब्रा स्थानकात पश्चिमेला असलेल्या घरांमध्येही खाडीचे पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले. त्यामुळे त्यापैकी काहींनी सध्या काम सुरु असलेल्या फलाटांमध्येच संसार मांडला होता. बाधितांच्या घरचे बहुतांश सामान फलाटात ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, ठाणो रेल्वेस्थानकातदेखील प्रवाशांनी लोकल रोखून धरत संताप व्यक्त केला. फलाट क्रमांक 3 वर लोकल येताच प्रवाशांनी ती तात्काळ मुंबईला सोडण्याचा आग्रह केला. पण रेल्वे प्रशासनाने काही न ऐकल्याने प्रवासी नाराज झाले. त्यांनी तातडीने स्थानक प्रबंधकांचे कार्यालय गाठून त्रगा केला. त्यानुसार रेल्वे अधिका:यांनी प्रवाशांच्या मागणीखातर विशेष लोकल सोडण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क केला आणि अखेरीस गाडी सोडण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.