आठवड्यातील तीन दिवस रस्त्यावरच मंडई

By admin | Published: August 27, 2015 12:28 AM2015-08-27T00:28:26+5:302015-08-27T00:28:26+5:30

केडीएमसीच्या विविध वॉर्डांमध्ये निरनिराळ्या समस्या दिसतात. काही ठिकाणी पालिकेने त्यांचे निराकरण केलेले आहे. तर कुठे त्यांच्या निर्मूलनासाठी तरतूदच केलेली नाही.

Three days a week, the street is on the road | आठवड्यातील तीन दिवस रस्त्यावरच मंडई

आठवड्यातील तीन दिवस रस्त्यावरच मंडई

Next

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली
केडीएमसीच्या विविध वॉर्डांमध्ये निरनिराळ्या समस्या दिसतात. काही ठिकाणी पालिकेने त्यांचे निराकरण केलेले आहे. तर कुठे त्यांच्या निर्मूलनासाठी तरतूदच केलेली नाही.
खंबाळपाडा वॉर्ड ६२ येथे भाजी मंडई उपलब्ध असूनही ती इमारत धूळखात पडलेली आहे. तर, वॉर्ड क्र. ६८ मध्ये मंडईसाठी आरक्षण नसल्याने इमारतच नाही. त्यामुळे हमरस्त्यावरच दुतर्फा आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि गुरुवार असे तीन दिवस भाजीबाजार भरविण्यात येतो. डोंबिवलीकरांची झुंबड येथे बघायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. यात एखादे वाहन आले तर त्यास वाट काढताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. यासाठी सुसज्ज भाजीमंडई उभारणे गरजेचे आहे.
याच ठिकाणाहून वसई-अहमदाबाद रेल्वे लाइन गेली आहे. रेल्वेच्या फ्रेट कॉरिडोरसाठी २५० रहिवाशांची घरे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यास नगरसेवकांसह रहिवाशांनी विरोध केला असून हरकतीही घेतल्या आहेत. परंतु, त्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. जागेच्या मोबदल्यात जागा अथवा चांगली रक्कम (आजच्या बाजारभावाप्रमाणे) देण्यात यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु, रेल्वे मात्र २००८ च्या रेटनुसार मोबदला तसेच ज्याच्या नावे जागा आहे, त्यालाच तो देणार असल्याचे सांगते. त्यामुळे ज्यांचे पागडी अथवा चाळीत घर आहे, त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून येथे खाडीकिनारा विकसित करण्यासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुमारे ६६ लाखांच्या निधीतून जेट्टी बनवण्यात आली आहे. त्या ठिकाणी बहुतांशी ज्येष्ठ नागरिक पहाटे फेरफटका मारायला जातात. चाळींसह काही प्रमाणात इमारतींचा हा परिसर असून तेथे पककया पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाण्याची समस्या होती, ती आता संपली आहे.

मेरीटाइम बोर्डाकडून निधी आणून काम झालेला हा एकमेव वॉर्ड आहे. रहिवाशांच्या जागांच्या समस्या सुटण्यासाठी राज्य शासनाने एफएसआय वाढवून द्यावा, जेणेकरून भाजी मंडईसह अन्य तांत्रिक मुद्यांच्या समस्या सुटतील. रेल्वे कॉरिडोरसंदर्भात रहिवाशांसोबतच रेल्वेशी पाठपुरावा सुरू आहे. आमदार-महापौरांच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चाळींमधील पायवाटांसह अन्य कामे झाली आहेत.
- सरोज भोईर, नगरसेविका, देवीचापाडा

Web Title: Three days a week, the street is on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.