कंपनीच्या साडेतीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून डिलीट करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक
By धीरज परब | Updated: February 26, 2025 23:38 IST2025-02-26T23:25:46+5:302025-02-26T23:38:49+5:30
Mira Road Crime News: एका सॉफ्टवेअर कंपनीच्या साडे तीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट करणाऱ्या कंपनीच्या उत्तर प्रदेशातील तिघा कर्मचाऱ्यांना मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे .

कंपनीच्या साडेतीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून डिलीट करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक
मीरारोड - एका सॉफ्टवेअर कंपनीच्या साडे तीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट करणाऱ्या कंपनीच्या उत्तर प्रदेशातील तिघा कर्मचाऱ्यांना मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.
मीरारोड भागात राहणार राज रामप्रसाद सिंग ( वय ३६ वर्षे ) यांचे पुनॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड व अॅब्सोल्युट सॉफ्ट सीस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्या आहेत . या कंपनीच्या मालकीचे ' मॅजिक लॉकर ' नावाचे सॉप्टवेअर आहे . सॉफ्टवेअरचा डाटा हॅक करून तो डिलीट केला प्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उगले , सहायक निरीक्षक सुधीर थोरात व पराग भाट सह राजेश काळकुंड, प्रमोद केंद्रे, महेश खामगळ, लालाजी लटके, रहमत पठाण तसेच सायबर तज्ञ पुष्कर झांन्टेय, समीर बयाणी यांनी तपास सुरु केला.
तांत्रिक विश्लेषणा वरून पोलीस सदर कंपनीच्या उत्तरप्रदेशातील वाराणसी शाखेतील कर्मचारी मनोजकुमार छोटेलाल मौर्या व हिमांशू अशोक सिंग यांना अटक केली तर चंद्रेश लालजी भारतीय ह्याला विरार मधून पकडले . त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेले ३ लॅपटॉप व ३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सदर डाटा हॅक करून स्वतःची कंपनी काढून सदर ग्राहक हे आपल्या कडे वळवण्याचा आरोपींची डाव आखला होता.
सॉफ्टवेअरच्या मुळ सोर्स कोडमध्ये हेराफेरी करुन व मॅजिक लॉकरच्या सर्वरमध्ये अनाधिकृतपणे अॅक्सेस मिळवून ३.५ लाख पेक्षा अधिक ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट केला . त्यामुळे सिंग यांना १ करोड ५१ लाख रुपयांची नुकसान भरपाई ग्राहकांना द्यावी लागली .