मे अखेर सुरू होणार तीन उड्डाणपूल, अंतिम आराखडा दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:57 AM2018-03-14T03:57:36+5:302018-03-14T03:57:36+5:30

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.

Three flyovers will be commissioned by end of May, final plan in two days | मे अखेर सुरू होणार तीन उड्डाणपूल, अंतिम आराखडा दोन दिवसात

मे अखेर सुरू होणार तीन उड्डाणपूल, अंतिम आराखडा दोन दिवसात

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.
दरम्यान कोपरी पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता आणि पर्यायी वाहतुकीचा अंतिम आराखडा दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मंगळवारी सकाळपासून आयुक्तांनी विविध विकास कामांची पाच तास पाहणी करून अधिकाºयांशी, नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी खोपट येथील थांबलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून केवळ पुनर्वसनामुळे रस्त्याचे काम थांबले असेल तर बाधित होणाºया नागरिकांचे बीएसयूपी किंवा रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करून काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रुंदीकरण करता येऊ शकेल काय याची चाचपणी करण्याच्या सूचना देऊन या रस्त्याचा प्लेन टेबल सर्वे करण्यासंबंधी त्यांनी संबंधित अधिकाºयांना सांगितले.
या भेटीत आयुक्तांनी जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करून त्याचे पुनरूज्जीवन करण्याबाबत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून तुम्हाला बेघर करणार नाही असा शब्द दिला.
दरम्यान शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून अल्मेडा चौक येथील पूल १५ एप्रिल, मल्हार सिनेमा जवळील पूल १५ मे आणि कॅसल मिल येथील
पूल ३० मे अखेर सुरू होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे नागरिकांची सोय होईल.
>पार्र्किं ग सुविधा मिळणार
मनोरूग्णालय आणि मॉडेला मिल या ठिकाणी रस्ते आणि पार्किंग सुविधा कशा निर्माण करता येतील, याची चाचपणी करण्याविषयीही त्यांनी अधिकाºयांशी चर्चा केली.

Web Title: Three flyovers will be commissioned by end of May, final plan in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.