ठाण्यातील तीन चौपाट्या डिसेंबरअखेर होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:25 AM2021-03-04T00:25:19+5:302021-03-04T00:25:58+5:30

विरंगुळा लांबल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड

Three fours in Thane will be completed by the end of December | ठाण्यातील तीन चौपाट्या डिसेंबरअखेर होणार पूर्ण

ठाण्यातील तीन चौपाट्या डिसेंबरअखेर होणार पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्मार्ट सिटीअंतर्गत गंटागळ्या खाणाऱ्या ४२ प्रकल्पांपैकी काही प्रकल्प या वर्षअखेर पूर्ण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत येथील चौपाटींची कामे डिसेंबरअखेर मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यात कोलशेत - १ किमी, नागलाबंदर १.४० किमी, कावेसार- ३.७० किमी, साकेत- २५० मीटर अशी या चौपाटींची कामे असणार आहेत.


गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट सिटीचे प्रकल्प गंटागळ्या खाताना दिसत होते. परंतु, आता कुठे काही प्रकल्प पूर्णत्वाकडे वळू लागले आहे.  मनपाने खाडीकिनारा विकसित करण्यासाठी (वॉटर फ्रंट डेव्हल्पमेन्ट) हा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत खाडीचा विकास करताना येथे बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, खाडी किनाऱ्यावर मॅंग्रोज टेल्स, प्रॉमिनेड्स, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पब्लिक प्लेसेस, मिनी पिकनिक सेंटर आदी बाबींचा समावेश आहे.
यात ठाणे शहर, खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, पारिसक चौपाटी, मुंब्रा व दिवा आदी ठिकाणच्या किनाऱ्याचा या माध्यमातून विकास होणार आहे. चार ठिकाणच्या या कामांसाठी २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी  पूर्वेतील खाडीकिनारी येथे वॉटर फ्रन्टच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. तर कोलशेत नागला बंदर, कावेसार-वाघबीळ येथे हा प्रकल्पासाठी मनपाने हरकती मागविल्या नाहीत, असे असतानाही ठेकेदाराला मात्र कामाची वर्कऑर्डर दिली. त्यामुळेही वादंग निर्माण झाला होता. परंतु आता वादंगावर पडदा टाकून मनपाने या प्रकल्पांचे कामे मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू करून डिसेंबरअखेर यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत चौपाटीचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा केला आहे.

पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळला
ठाणे : सुमारे ९० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले पारसिक आणि मासुंदा तलाव चौपाटीचे काम प्रगतीपथावर आहे. यातील पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळून तिचे काम करण्यात  येत आहे. पारसिक चौपाटीला ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या चौपाटीचे काम मार्गी लागणे गरजेचे होते. यासाठी सुमारे ७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, येथील जागेत बाधित झालेल्या काहींचे पुनर्वसन न झाल्याने या चौपाटीचे काम रखडले होते. परंतु, आता या चौपाटीचा तेवढा हिस्सा वगळून उर्वरित ५० टक्के काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

मासुंदा चौपाटीचे कामही वेगात
nसध्या स्मार्टसिटीअंतर्गत मासुंदा तलाव परिसर सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी १४ कोटींचा खर्च केला जात आहे. त्यानुसार हे कामदेखील डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. तसेच येथील ग्लास पाथवेचे कामही याच बरोबर पूर्ण होणार आहे.
nदुसरीकडे स्मार्ट मोबिलिटी या प्रकल्पाचे कामही येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवर किंवा फूटपाथवरून योग्य पद्धतीने चालता यावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे.

Web Title: Three fours in Thane will be completed by the end of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.